तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का ? मग केंद्रीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी निघाली भरती, इथं करा अर्ज

10th Pass Job : नोकरीच्या शोधात असलेल्या विशेषता सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या तरुणांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि किमान दहावी उत्तीर्ण असतील अशा तरुणांसाठी ही तर खऱ्या अर्थाने एक मोठी सुवर्णसंधी राहणार आहे.

कारण की, केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदाच्या 677 रिक्त जागांसाठी एका मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाने अधिसूचना देखील निर्गमित केली आहे.

सदर अधिसूचनेनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. अशा परिस्थितीत आज आपण केंद्रीय गुप्तचर विभागात निघालेल्या या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

अधिसूचनेनुसार, या भरतीच्या माध्यमातून केंद्रीय गुप्तचर विभागात सेक्युरिटी असिस्टंट/मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती ?

सेक्युरिटी असिस्टंट/मोटार ट्रान्सपोर्ट या पदाच्या 362 रिक्त जागा आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदाच्या 315 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजेच या दोन्ही पदाच्या एकूण 677 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

सिक्युरिटी असिस्टंट/मोटार ट्रान्सपोर्ट या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण आणि हलके वाहन चालक परवाना असलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि या पदासाठी किमान एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच मल्टी टास्किंग स्टाफ या पदाचा विचार केला तर या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहतील. तथापि उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

सेक्युरिटी असिस्टंट / मोटार ट्रान्सपोर्ट या पदासाठी कमाल 27 वर्षापर्यंतचे उमेदवार पात्र राहणार आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मात्र 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.

नोकरी कुठे करावी लागणार

या भरती प्रक्रिया अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारत वर्षात कुठेही नोकरी करावी लागू शकते.

अर्ज कसा करणार?

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. www.ncs.gov.in या संकेतस्थळावर जाऊन किंवा https://www.mha.gov.in/en या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. पण विहित मुदतीनंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. 

जाहिरात कुठे पाहता येणार

https://drive.google.com/file/d/1a-7zriDnAQ9OL2V__UdoXDF1GHlcRxY7/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.