12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! सिक्युरिटी असिस्टंट पदाच्या 436 जागांसाठी ‘इथे’ निघाली मेगाभरती, कुठं करणार अर्ज?

12th Pass Job : सध्या देशात नवरात्र उत्सव सुरू आहे आणि सर्वत्र दांडिया आणि गरब्याची मोठी धूम पाहायला मिळत आहे. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या या आनंददायी पर्वात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक गुड न्यूज आहे.

जे तरुण बारावी पास असतील आणि नोकरी शोधत असतील अशा तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेस कंपनी लिमिटेड येथे काही रिक्त पदांच्या जागांसाठी एका भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या पदभरतीच्या माध्यमातून बारावी पास तरुणांना नोकरी मिळवण्याची संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे सदर भरतीची अधिसूचना देखील जारी झाली आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सणासुदीच्या दिवसात ही मोठी भेट राहणार आहे.

दरम्यान, आता आपण या पदभरती अंतर्गत कोणकोणत्या रिक्त पदांसाठी भरती होईल, यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल, अर्ज कसा करावा लागेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय, यांसारख्या सर्वच महत्त्वाच्या बाबींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

या पदभरती अंतर्गत असिस्टंट सेक्युरिटी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती?

या पदभरती अंतर्गत 436 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी किमान बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहतील. तथापि रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार पाच वर्षांपर्यंतची सुट राहणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मात्र एकदा अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.

किती पगार मिळणार?

या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना पहिल्या वर्षी 21 हजार 500, दुसऱ्या वर्षी 22 हजार, तिसऱ्या वर्षी 22500 रुपये प्रति महिना एवढे मानधन दिले जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागेल

यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. https://aaiclas.aero/careeruser/login या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

जाहिरात कुठे पाहणार?https://drive.google.com/file/d/1GS8kavdLdLGkaIXi7CHZ1q4yewqx3F_J/view?usp=drivesdk या लिंकवर सदर भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येईल.