पुणे बाजारभाव : आवक कमी झाल्याने शेतमाल तेजीत ! टोमॅटो, फ्लॉवर, कांदा, मिरची, बटाट्याच्या भावात झाली वाढ

Pune market prices : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या भावात वाढ झाली तर टोमॅटो फ्लॉवर,

बटाटा, हिरव्या मिरचीची आवक कमी झाल्याने भाव वधारले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू यांची किरकोळ आवक झाली.

जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. जनावरांच्या बाजारात जर्सी गायी,

बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ४ कोटी ३० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ७५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १५० क्विंटलने कमी झाल्याने कांद्याचा कमाल भाव २,५०० रुपयांवरून ४,००० रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक २,७५० क्विंटल झाली.

गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ६५० क्विंटलने वाढूनही कमाल भाव १,९०० रुपयांवरून २,००० रुपयांवर स्थिरावले.

जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली.

गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४ क्विंटलने वाढूनही लसणाचा कमाल भाव १४ हजार रुपयांवरच स्थिरावला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक ४०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ६१ क्विंटलने वाढूनही हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

दसऱ्यामुळे शेतकरीवर्ग सणासुदीच्या खरेदीत गुंतला आहे. त्यामुळे बाजारात शेतमाल कमी आला असल्याने भावात मात्र प्रचंड वाढ झाली आहे. मेथी, कोथिंबीर जुडीचा भाव ३० ते ४० रुपये आहे.

फळभाज्या: फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक विचटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे : टोमॅटो- ३३० क्विटल ( ४०० ते ८०० रु. 3. कोबी- २२१ क्विटल (५०० ते १,०००रु.1. फ्लॉवर २३६ क्विटल [ १,००० ते १,५०० रु.), वांगी – ९२ क्विटल [ ३,००० ते ४,००० रु.), भेंडी ८५ क्विटल [ ३,००० ते ४,००० रु.), दोडका ६४ क्विंटल ३,००० ते ४,००० रु.), कारली- ७८ क्विटल [ २,००० ते ३,००० रु.),

दुधीभोपळा ५८ क्विटल [२,००० ते ३,००० रु.), काकडी ७० विचेटल ( १,००० ते २५०० रु.), फरशी ६० क्विंटल ( ३,००० ते ४,००० रु.), वालवड ६३ विचटल [ ५,००० ते ७,००० रु.), गवार ४५ क्विंटल ( ३,००० ते ४,००० रु.), डोबळी मिरची १५६ विचेंटल २,००० ते ४,००० रु.), चवळी २९ विचटल ( २,००० ते ३,००० रुपये.), वाटाणा ३२ विचटल [ १०,००० ते १४,००० रु.), शेवगा २५ विचेटल ( ५,००० ते ७,००० रु.), गाजर १२३ क्विटल (२,५०० ते २५०० रु.).

पालेभाज्या :
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- मेथी एकूण २ हजार ४०० जुड्या (१,५०० ते २,५०० रुपये), कोथिंबीर हजार ५०० जुड्या (५,०० ते • एकूण १९ २,५०० रुपये), शेपू एकूण ३ हजार ८०० मुड्या (८०० ते १,५०० रुपये), पालक एकूण ४ हजार ६०० जुड्या ( ५०० ते ९०० रुपये).

जनावरे :
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४० जर्सी गायींपैकी २५ गायींची विक्री झाली. (१५,००० ते ७५,००० रु.) ८० बैलांपैकी ५० बैलांची विक्री झाली. (१०,०००- ते ३५,००० रु.) २०० म्हशींपैकी १७० म्हशींची विक्री झाली. (३०,००० ते ८०,००० रु.), ५५०० शेळ्या-मेंढ्यांपैकी ५००० शेळ्यांची विक्री झाली. (२,००० ते २५,००० रु.)

शेतीमालाची आवक व बाजारभाव :
■ बटाटा एकूण आवक २.७५०० विचेटल भाव क्रमांक १. २,००० रुपये, भाव क्रमांक २.१,५०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये.
■ कांदा एकूण आवक ७५० विचटल, भाव क्रमांक १. ४,००० रुपये, भाव क्रमांक २. ३,००० रुपये, भाव क्रमांक ३. २,००० रुपये,