मुख्यमंत्री शिंदेचा शेतकऱ्यांना कानमंत्र ! ऊसाऐवजी ‘या’ पिकाची लागवड करण्याचा दिला सल्ला अन सांगितलं उत्पन्नाचं गणित

Agriculture News : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधव नैसर्गिक संकटांमुळे संकटात आले आहेत. महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, ढगाळ हवामान, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याच पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. जर या नैसर्गिक संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी एखाद्या पिकातून चांगले उत्पादन मिळवले तर त्या पिकाला बाजारात चांगला भाव मिळत नाही.

शेतमालाला चांगला भाव न मिळणे, योग्य उत्पादन न मिळणे यामुळे शेतीचा व्यवसाय गेल्या काही वर्षांमध्ये आव्हानात्मक बनला आहे. शेती करणे अलीकडे जीकीरीची बाब बनली आहे. हेच कारण आहे की गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेले नवयुवक शेतकरी पुत्र देखील शेती नको रे बाबा असा ओरड करू लागले आहेत.

एकतर निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे आणि दुसरे म्हणजे शासनाचे अनैतिक धोरण देखील शेतकऱ्यांसाठी खूपच मारक ठरत आहे. मात्र जर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तर शेतीमधूनही चांगली कमाई होऊ शकते.

दरम्यान शेतकरी बांधवांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना एक कानमंत्र दिला आहे. खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच दोन दिवसीय सुट्टीसाठी आपल्या मूळ गावी परतले होते.

या ठिकाणी त्यांनी शेतीमध्ये मोठा टाइम स्पेंड केला. गावी परतून शेती कामांमध्ये  ते रमले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या गावातील एका वृक्षारोपण कार्यक्रमात देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमातच त्यांनी शेतकरी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन देखील केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी ग्रुप फार्मिंग म्हणजेच समूह शेती करण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच त्यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की बांबूचा उपयोग बांधकामात मोठ्या प्रमाणात होतो.

बांबूपासून अनेक सजावटीच्या वस्तू तयार केल्या जातात. यापासून खेळण्या, चटाई, टोकऱ्या, भांडे, सजावटी सामान यांसारख्या वस्तू तयार केल्या जातात. बांबून पासून घरांची देखील निर्मिती केली जाऊ लागली आहे. यामुळे बांबूला बाजारात मोठी मागणी असते. तसेच इथेनॉल निर्मितीसाठी देखील बांबूचा वापर होऊ लागला आहे.

म्हणून बांबूचे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते आणि हेच कारण आहे की मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना या पिकाची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे बांबू शेतीसाठी शासनाकडून अनुदान देखील दिले जात आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ऊस पिकापेक्षा बांबूची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते हे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून सांगितले आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी बांबू लागवडीतील आर्थिक गणित शेतकऱ्यांच्या पुढ्यात मांडले आहे. ते म्हणतात की ऊस पिकापेक्षा बांबू पिकासाठी कमी पाणी लागते. एक टन उसापासून 80 लिटर इथेनॉलची निर्मिती होते पण एक टन बांबूपासून 200 लिटर इथेनॉलची निर्मिती होत असते.

एवढेच नाही तर उसाचे हेक्टरी 100 टन उत्पादन मिळते तर बांबूचे हेक्टरी 200 टन उत्पादन मिळू शकते असं त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे ऊसाला 2500 रुपये प्रति टनचा भाव मिळतो पण बांबूला चार हजार रुपये प्रति टनचा भाव मिळतो. यामुळे शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केली पाहिजे असे मत मुख्यमंत्री महोदय यांनी यावेळी व्यक्त केले आहे.