नवरात्रोत्सवानिमित्त पुणे-मुंबई महामार्गावरील अवजड वाहनांसाठी पर्यायी वाहतूक

शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील वेहेरगाव,

कार्ला येथील श्री एकवीरा देवी मंदिर परिसरात उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात पार पाडला जात असून, या ठिकाणी मोठी यात्रादेखील असते. त्या पार्श्वभूमीवर परिसरात लोणावळा,

मुंबई महामार्ग असून, वाहतूक कोंडी होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था राहावी, म्हणून अवजड वाहतूक पर्यायी बाह्यमार्गावरून वळवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

मौजे वेहेरगाव, कार्ला येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कार्ला फाटा ते श्री एकवीरा देवी पायथा मंदिरदरम्यान १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण वेळ जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील.

२१ ते २३ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा-कुसगाव बुद्रुक टोलनाका – वडगाव फाटामार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड अवजड वाहनांची वाहतूक – बंद करून ती खंडाळा- – कुसगाव टोलनाक्यामार्गे पुण्याच्या दिशेने वळवण्यात आली आहे. त्याच दरम्यान,

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वडगाव तळेगाव फाटा-लोणावळा- मुंबई बाजूकडे जाणारी जड- अवजड वाहनांची वाहतूक बंद करून ती तळेगाव फाटा येथून उसे खिंड,

उर्से टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या दिशेने वळवण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे