गुड न्युज ! महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या बँकेत निघाली भरती, कोणते पद भरले जाणार, कोण राहणार पात्र ? वाचा…

Banking Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर सध्या संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाची धूम आहे. दांडिया, गरबा यामुळे संपूर्ण देशात नवचैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान या आनंदाच्या वातावरणात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक गुड न्युज समोर आली आहे. विशेषतः बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की, नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड या महाराष्ट्रातील एका मोठ्या सहकारी बँकेत एक पदभरती आयोजित करण्यात आली आहे.

या भरतीच्या माध्यमातून बँकेतील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. विशेष असे की, यासाठी बँकेने अधिसूचना निर्गमित केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती ?

अधिसूचनेनुसार, नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड या बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर या पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहेत. जसे की JAIIB / CAIIB / MBA / CA / ICWA पर्यंतचे शिक्षण घेतलेले उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहेत. तथापि या पदासाठीची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिसूचना काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड, नागपूर 79, डॉक्टर आंबेडकर स्केवर, सेंट्रल इव्हेंन्यू नागपूर, 440008 या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख

या पदासाठी चार नोव्हेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज सादर करता येणार आहे.

जाहिरात कुठे पाहणार ?

https://acrobat.adobe.com/link/track?uri=urn:aaid:scds:US:aa9fbc7a-b559-391d-b3a2-f48787b3a3cb या लिंकवर जाऊन या भरतीची जाहिरात पाहता येणार आहे.