‘भीमाशंकर’ चे ९ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट: मंत्री वळसे पाटील

Maharashtra News : राज्यात उशिरा व कमी पाऊस झाल्याने उसाची लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने

सहकारी साखर कारखाने अडचणीत आले असून यावर्षी उसाची पळवा पळवी होणार असून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ९ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे,

असे प्रतिपादन सहकार मंत्री व भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांनी केले.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर कारखान्याचा २४ वा बॉयलर अग्नी प्रदिपन आणि गव्हाण पूजन समारंभ सहकार मंत्री वळसे पाटील व संत, महत, यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, पराग कारखान्याचे अध्यक्ष जयवर्धन डहाके,

विघ्नहरचे उपाध्यक्ष यशराज काळे, मंगलदास बांदल, विष्णू हिंगे, माजी जि. प. सदस्य विवेक वळसे पाटील,

संचालक बाळासाहेब घुले, दादा पोखरकर, रामहरी पोंदे, नितीन वाव्हळ, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव ढोबळे,

दौलतराव लोखंडे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे उपस्थित होते.

सहकार मंत्री वळसे पाटील म्हणाले, केंद्र सरकारने साखर उद्योगांमध्ये नवीन पॉलिसी आणली.