Business Idea : जर तुम्ही कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. कारण की, आज आपण एका भन्नाट बिजनेस आयडिया बाबत जाणून घेणार आहोत. खरंतर अलीकडे तरुणाईचा व्यवसाय सुरू करण्याकडे कल आहे.
आता नोकरीऐवजी आपला स्वतःचा हक्काचा व्यवसायचं बरा अशी धारणा तरुणांमध्ये निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शासन व्यवसाय सुरू करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करीत आहे. व्यवसायाला चालना मिळावी म्हणून केंद्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत.
पंतप्रधान मुद्रा योजना सारख्या अनेक कल्याणकारी योजना शासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. पण अनेक जणांना कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत सुचत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही एका भन्नाट बिझनेस आयडिया बाबत माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण ज्या व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत त्या व्यवसायाद्वारे तुम्ही 25 ते 30 टक्के नफा सहजतेने कमवू शकता.
आज आपण ऑइल मिल व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा व्यवसाय गावात किंवा शहरात जिथे जागा मिळेल तिथे हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. खरतर स्वयंपाक करण्यापासून ते औषधे बनवण्यासारख्या अनेक महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो.
स्वयंपाकासाठी तेल हा मुख्य घटक आहे. यामुळे बाजारात बारा महिने सर्व प्रकारच्या तेलाची मोठी मागणी राहते. म्हणून ऑईल मिलचा व्यवसाय सुरू केल्यास या व्यवसायातून चांगली कमाई करता येणार आहे. विशेष म्हणजे 12 महिने तेलाला मागणी असते. महागाई कितीही वाढली तरी देखील तेल वापरले जातेच. तेलाशिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही म्हणून कधीही हा व्यवसाय मंदीत येणार नाही.
कसा सुरु केला जाऊ शकतो हा व्यवसाय ?
हा ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम चांगल्या जागेची निवड करावी लागणार आहे. योग्य जागा निवडल्यानंतर तुम्हाला या व्यवसायासाठी शेड तयार करावे लागणार आहे. जर तुम्ही खेड्यात ऑईल मिल लावली तर तुम्हाला थोडा कमी खर्च करावा लागतो. पण शहरी भागात अर्थातच अर्बन एरियामध्ये व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला थोडा अधिक खर्च करावा लागणार आहे.
या व्यवसायासाठी आवश्यक असलेला कच्चा माल तुम्हाला स्थानिक पातळीवरचं मिळणार आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कामगार लागणार आहेत. यासाठी तुम्हाला कच्चा माल, यंत्रसामग्री, प्लास्टिकच्या बाटल्या, टिनचे डबे इत्यादी गोष्टी लागणार आहेत. तेल काढण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार इलेक्ट्रिक किंवा डिझेल मशीन घेऊन हा व्यवसाय सुरु करू शकता.
किती खर्च करावा लागणार बर ?
ऑइल मिलचा व्यवसाय जर तुम्ही लहान स्तरावर सुरु केला तर तुम्हाला या व्यवसायासाठी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात किमान 2 ते 3 लाख रुपये गुंतवावे लागतील. पण जर व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू करायचा असेल तर गुंतवणुकीची ही रक्कम वाढवावी लागणार आहे. यातील सर्वाधिक खर्च हा यंत्रसामग्रीवर होणार आहे.
तुम्ही तुमच्या क्षेत्रानुसार व बाजारपेठेनुसार गिरणी उभारू शकता. तसेच व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला काही लायसन्स काढावे लागणार आहेत. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी देखील करावी लागणार आहे. व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी तुम्ही MSME वेबसाइटवर यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
तथापि, हा खाद्यपदार्थाशी संबंधित व्यवसाय आहे, त्यामुळे FSSAI कडून लायसन्स म्हणजे परवाना मिळवावा लागेल. लायसन्स न काढता हा व्यवसाय तुम्ही सुरु करू शकत नाहीत. दरम्यान तयार तेल तुम्हाला आजूबाजूच्या गावात, शहरात विक्री करावी लागणार आहे. जेवढी जास्त विक्री होईल तेवढा तुम्हाला नफा या व्यवसायातून मिळवता येणार आहे.