बिजनेस स्टार्ट करायचाय ? ‘हा’ व्यवसाय सुरु करा अन लाखोत कमवा, 12 महिने चालणार धंदा, वाचा सविस्तर

Business News : अलीकडे तरुण वर्गात व्यवसायाची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. पूर्वी उच्च शिक्षण घेतले की नवयुवक तरुण नोकरीच्या शोधात असत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे आता नोकरी नको तर आपला हक्काचा आणि स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न तरुणांनी उराशी बाळगले आहे. परंतु व्यवसाय सुरू करताना तरुणांना काही आव्हानांचा सामना करावा लागतो.

तरुणांना कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत फारशी आयडिया नसते. जर तुम्हाला ही व्यवसाय सुरू करायचा असेल पण कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत तुमच्या मनात संभ्रम असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एका विशेष बिजनेस प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुमच्यासाठी एका फ्रेंचाईची बिझनेस मॉडेलची माहिती घेऊन आलो आहोत. 

कोणता आहे तो व्यवसाय

तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही अमूल कंपनीची फ्रेंचाईजी घेऊ शकता. खरे तर अमूल हा देशातील एक नामांकित डेअरी प्रॉडक्ट ब्रँड आहे. अमूलचे प्रॉडक्ट संपूर्ण देशात विकले जात आहेत. या प्रॉडक्ट्सला बाजारात मोठी मागणी देखील आहे. यामुळे जर तुम्ही ही व्यवसाय करू इच्छित असाल तर अमुलची फ्रेंचाईजी घेऊ शकता. अमूल सोबत भागीदारी करून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.

कसा सुरु करणार व्यवसाय ?

जर तुम्हाला फ्रँचायझीं बिजनेस सुरु करायचा असेल तर अमूल तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे. कारण की या कंपनीचे प्रॉडक्ट बाजारात हातोहात विकले जात आहेत. याच्या प्रॉडक्टच्या विक्रीसाठी तुम्हाला मार्केटिंग ची गरज पडणार नाही. अमूल एक मोठा ब्रँड आहे. लोक स्वतःहून अमुलच्या प्रोडक्टची मागणी करतात. यामुळे अमूल फ्रँचायझीं Business नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायझीं देत असते. या दोन्ही प्रकारच्या फ्रँचायझीसाठी आवश्यक असलेली गुंतवणूक आणि कमाई दोन्हीही भिन्न राहणार आहेत. जर तुम्ही हा बिजनेस सुरू केला तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे कारण की कंपनी प्रॉफिट शेयरिंग करत नाही. अमूल आपल्या उत्पादनांच्या विक्रीवर कमिशन देते, म्हणजेच विक्रीवर तुमचा नफा ठरतो.

किती गुंतवणूक करावी लागेल 

अमूल आपले आउटलेट उघडण्यासाठी दोन प्रकारच्या फ्रँचायझी ऑफर करते, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्क आणि अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरचा अशा या दोन फ्रँचायझी आहेत. या दोघांचा खर्च हा वेगवेगळा आहे. जर तुम्हाला अमूल आउटलेट किंवा रेल्वे पार्लर खोलायचे असेल तर यासाठी तुम्हाला 150 चौरस फुटांचे दुकान ओपन करावे लागणार आहे.

यासाठी तुम्हाला नॉन-रिफंडेबल सिक्युरिटी म्हणून 25,000 रुपये द्यावे लागतील. याशिवाय नूतनीकरणासाठी 1 लाख रुपये आणि उपकरणांसाठी 75 हजार रुपये मागितले जाणार आहेत. म्हणजे एक आउटलेट उघडण्यासाठी दोन लाख रुपये लागतील. पण जर तुम्हाला आईस्क्रीम पार्लर खोलायचे असेल तर तुम्हाला ३०० चौरस फूट जागा लागणार आहे.

या दुसऱ्या प्रकारच्या फ्रॅंचायजीसाठी 50,000 रुपये सुरक्षा ठेव म्हणून भरावे लागणार आहेत. तसेच नूतनीकरणासाठी 4 लाख रुपये आणि उपकरणांसाठी 1.50 लाख रुपये लागतील. म्हणजे या दुसऱ्या प्रकारची फ्रेंचायजी घेण्यासाठी तुम्हाला 6 लाखाची गुंतवणूक करावी लागेल.

किती नफा मिळणार बर ?

या बिजनेसमधून मिळणारी कमाई ही सर्वस्वी तुमच्या विक्रीवर अवलंबून राहणार आहे. कंपनी प्रॉडक्ट विक्रीवर कमिशन देते. यामध्ये दुधाच्या पाऊचवर 2.5 टक्के कमिशन, दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. म्हणजेच जेवढा तुमचा सेल वाढेल तेवढे तुम्हाला चांगले कमिशन मिळणार आहे.

जर तुमचे दुकान बाजारपेठांमध्ये असेल तर तुमचा धंदा चांगला होईल आणि साहजिकच यामुळे तुम्हाला चांगली कमाई देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमूल फ्रॅंचायजीबाबत अधिकची माहिती तुम्ही अमूलच्या https://amul.com या वेबसाइटवरून जाऊन मिळवू शकणार आहात.