‘पांढरं सोन’ शेतकऱ्यांना परवडणार का ? महाराष्ट्रात कापसाला काय भाव मिळतोय, वाचा…

Cotton Rate Maharashtra : पांढर सोन अर्थातच कापूस हे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मधील बहुतांशी जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाला कॅश क्रॉप अर्थातच नगदी पिकाचा दर्जा देण्यात आला आहे.

परंतु गेल्या हंगामापासून हे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. एकतर कापूस लागवडीपासून ते वेचणीपर्यंत शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा अधिकचा खर्च करावा लागतो. इतर पीक उत्पादित करण्यापेक्षा कापूस पीक उत्पादित करणे महाग आहे.

कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव, शेतमजुरीचे वाढलेले दर या सर्व पार्श्वभूमीवर आता हे पीक शेतकऱ्यांना परवडत नाहीये. शिवाय कापसाची एकरी उत्पादकता देखील दिवसेंदिवस कमी होत आहे.

यामुळे अनेकदा तर या पिकाला आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना पदरमोड करून भागवावा लागतो. तरीही मात्र शेतकरी बांधव एखाद्या वर्षी पांढऱ्या सोन्याला चांगला भाव मिळेल म्हणून या पिकावर दरवर्षी जुगार खेळतात.

यंदा देखील अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. पण या हंगामात देखील कापसाचे बाजार भाव अजूनही दबावातच आहे. शेतकऱ्यांची कापसाला किमान आठ हजाराचा भाव मिळावा अशी आशा आहे.

मात्र सध्या स्थितीला कापूस कमाल साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दारात विकत आहे. सरासरी बाजार भाव हे 7100 ते 7400 दरम्यान आहेत. आता आपण आज अर्थातच 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला काय भाव मिळाला आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कापसाला किमान 7310, कमाल 7435 आणि सरासरी 7400 एवढा भाव मिळाला आहे.

सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये लॉंग स्टेपल कापसाला किमान 7150, कमाल 7201 आणि सरासरी 7160 एवढा भाव मिळाला आहे.

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापूस किमान 7100, कमाल 7250 आणि सरासरी 7175 या भावात विकला गेला आहे.

मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापूस किमान 7100, कमाल 7375 आणि सरासरी 7325 या भावात विकला गेला आहे.

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : मार्केटमध्ये आज कापूस किमान 7000, कमाल 7180 आणि सरासरी सात हजार 100 या भावात विकला गेला आहे.