डॉ. नीलम गो-हेंविरोधात आरोप केल्याने बोरवणकर अडचणीत येणार?

Maharashtra News : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकामध्ये शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गो-हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात पुणे बंदमध्ये हिंसाचारासंबंधीचे पुरावे होते,

असा दावा केला होता. यावर आता न्यायालयाने निर्दोष जाहीर करताना गो आणि नार्वेकर यांच्याबद्दल कोणीही लेखन अथवा वक्तव्ये करू नयेत,

असे स्पष्ट निर्देश होते. मात्र, बोरवणकर यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा ज्येष्ठ विधी तज्ज्ञांनी केला आहे.

विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात केलेल्या दाव्यानंतर मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकावरून प्रचंड वादंग निर्माण झाले होते.

या वादंगावर स्पष्टीकरण देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोरवणकर यांनी पुण्यात कार्यरत असताना बंद पुकारण्यात आला होता.

त्या बंदमध्ये हिंसाचार पसरविण्यामध्ये नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांचा सहभाग होता. त्याचे पुरावे माझ्याकडे होते, परंतु पोलिसांनी मला सांगितले,

मॅडम तुम्ही गुन्हा दाखल करू नका. आम्हाला तुम्हाला मुंबईत पोलीस आयुक्त म्हणून बघायचे आहे.

तुम्ही असे केले तर आयुक्तपद मिळणार नाही. त्यामुळे आपण कारवाई केली नव्हती. बोरवणकर यांच्या दाव्यानंतर आता गोऱ्हे समर्थक यांनी न्यायालयाने निर्दोषत्व सिद्ध केल्यानंतर असे आरोप करणे चुकीचे असून, न्यायालयाच्या आदेशाचा हा अवमान आहे.

त्यामुळे बोरवणकर यांच्याविरोधात न्यायालयीन लढाईची सुरुवात केली आहे. तर याच प्रकरणावर काही ज्येष्ठ तज्ज्ञांनी न्यायालयाने या प्रकरणात आदेश देत असताना स्पष्टपणे संबंधित प्रकरणावर कोणतेही भाष्य अथवा लेखन करू नये,

असे आपल्या आदेशात नमूद केले असतानादेखील त्यावर पुन्हा चर्चा घडवून आणणे हे निरर्थक असून,

हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरू शकतो, असा दावा केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.