थेरगाव येथील महापालिकेच्यारुग्णालयात कंत्राटी पद्धतीने रखवालदार आणि मदतनीस या पदांच्या नोकरीसाठी खोटी कागदपत्रे दिल्याचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी गुरूवारी (दि.१२) तीन महिलांसह पाच जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपक सीताराम वाघ (वय ४२, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार तीन महिला, अनिल सुदाम शेळके (वय ४५, रा. चिंचवड), काळूराम केशव ओव्हाळ (वय ४३, रा. थेरगाव गावठाण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
हा प्रकार मार्च २०२३ पासून सुरु होता. फिर्यादी हे नॅशनल सिक्युरिटी सर्विस या कंपनीत नोकरी करतात.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या न्यू थेरगाव हॉस्पिटल मध्ये नॅशनल सिक्युरिटी सर्विस या कंपनीतर्फे कंत्राटी पद्धतीने रखवालदार, मदतनीस या पदांसाठी भरती करण्यात आली.
त्यात आरोपींनी नववी पास असल्या बाबतचे बनावट खोटे शाळा सोडल्याचे दाखवले बनवून ते फिर्यादी यांच्याकडे जमा केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून गंडा
बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून महिलेला २८ हजार ८०० रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी बुधवारी (दि.११) आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २० मार्च रोजी चन्होली खुर्द येथे तनिष वाटिका सोसायटी येथे घडली. फिर्यादी महिला घरी असताना आरोपीने त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती संगणकाच्या माध्यमातून काढून घेतली.
त्यानंतर फिर्यादी यांच्या युपीआय आयडी द्वारे दोन हजार रुपये, २१ हजार ८०० रुपये आणि पाच हजार रुपये असे तीन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पैसे घेत फिर्यादीची फसवणूक केली.