सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी खुशखबर ! आता ‘या’ अँप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार अवघ्या 2 मिनिटात कर्ज, कसा करणार अर्ज ?

Google Pay Loan : गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात सणासुदीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात संपूर्ण देशाने गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व साजरा केला आहे. तसेच या चालू महिन्यात नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा करण्यात आला आहे.

नवरात्र उत्सव आणि विजयादशमीमुळे संपूर्ण देशात अतिशय उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. शिवाय आता पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दरम्यान दिवाळी सणाच्या पूर्वीच देशातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

ही बातमी देशातील छोट्या व्यवसायिकांसाठी खूपच फायदेमंद ठरणार आहे. कारण की, आता देशातील नागरिकांना गुगल पे या पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनिटांच्या कालावधीत 15,000 पर्यंतचे कर्ज मिळणार आहे. गुगलने ही नवीन सुविधा सुरू केली असून यासाठी एका कंपनीसोबत गुगलने भागीदारी केली आहे.

गुगल पे या पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून देशातील छोट्या व्यावसायिकांना हे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्जाची एक विशेषता अशी आहे की, हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून या कर्जासाठी अप्लाय करू शकता आणि स्मार्टफोनद्वारेच हे कर्ज मंजूर होणार आहे.

गुगल पे या पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून सात दिवसांपासून ते बारा महिन्यांच्या कालावधीसाठी हे कर्ज दिले जाणार आहे. आता आपण गुगल पे या अँप्लिकेशनचा वापर करून कशा पद्धतीने कर्ज मिळवले जाऊ शकते याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कोणाला मिळणार कर्ज ?

गुगल पे ने छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी डीएमआय फायनान्स या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. गुगल पे छोट्या व्यावसायिकांना 15,000 पर्यंतचे कर्ज देणार आहे. ज्या व्यवसायिकांचे मासिक उत्पन्न 30 हजार रुपये आहे अशा व्यावसायिकांना हे कर्ज मिळणार आहे.

या कर्जाची एक विशेषतः अशी की या कर्जाची परतफेड मासिक 111 रुपयाच्या हप्त्याने केली जाऊ शकते. यामुळे कर्ज फेडताना छोट्या व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने छोट्या व्यवसायिकांना कर्ज देण्यासाठी आयसीआयसीआय एचडीएफसी कोटक महिंद्रा आणि फेडरल बँक या चार बँकांसोबत करार केला आहे. सध्या स्थितीला गुगलची ही सेवा काही मोजक्या शहरांमध्ये सुरू आहे. भविष्यात मात्र याचा विस्तार देशातील इतरही भागात होणार आहे.

कसं मिळवणार कर्ज ?

गुगल पे कडून जर तुम्हाला कर्ज मिळवायचे असेल तर तुमचे गुगल पे फोर बिझनेस या एप्लीकेशनवर खाते असायला हवे.

जर तुमचे गुगल पे फॉर बिजनेस एप्लीकेशनवर खाते असेल तर कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला गुगल पे फॉर बिझनेस एप्लीकेशन उघडावे लागणार आहे.

यानंतर तुम्हाला लोन सेक्शन मध्ये जायचे आहे. यानंतर ऑफर या TAB वर क्लिक करायचे आहे.

येथे तुम्हाला कर्जाची रक्कम सिलेक्ट करावी लागेल. यानंतर गेट स्टार्टवर क्लिक करायचे आहे.

यानंतर मग कर्ज देणाऱ्या भागीदार कंपनीच्या वेबसाईटवर तुम्ही जाल.

येथे तुम्हाला तुमच्या गुगल खात्यात लॉग इन करावे लागेल.

या ठिकाणी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यायची आहे.

तसेच कर्जाची रक्कम आणि कर्ज किती कालावधीसाठी घ्यायचे आहे हे देखील तुम्हाला सिलेक्ट करावे लागेल.

यानंतर मग तुम्हाला तुमचे लोन रिव्यू करावे लागणार आहे.

यानंतर तुम्हाला काही केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

यानंतर मग तुम्हाला मासिक हप्त्यासाठी सेटअप इमँडेट किंवा सेटअप NACH वर क्लिक करावे लागेल.

मग तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. एवढे केल्यानंतर तुम्ही जर कर्जासाठी पात्र असाल तर तुम्हाला कर्ज मंजूर होईल.