बातमी कामाची ! Google Pay देणार कर्ज, कसा करणार अर्ज ? पहा संपूर्ण प्रोसेस

Google Pay Loan Process : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे डिजिटल पेमेंट एप्लीकेशन वापरणाऱ्यांची संख्या देखील देशात खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. डिजिटल पेमेंटमुळे नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाचत आहे.

गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनमुळे रोकड व्यवहाराला आळा बसला असून आपला देश कॅशलेस इकॉनोमीकडे वेगाने वाटचाल करत आहे. विशेष म्हणजे केंद्र शासन देखील डिजिटल पेमेंटला प्रोत्साहित करीत आहे. डिजिटल पेमेंट एप्लीकेशन देखील आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता डिजिटल पेमेंट एप्लीकेशन फक्त पेमेंट करण्यासाठी आणि पेमेंट स्वीकारण्यासाठीच सिमीत राहिलेल्या नाहीत. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता नागरिकांना इतरही अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा वापर करून आता मोबाईल रिचार्ज, डिश टीव्ही रिचार्ज, EMI, LIC चे हफ्ते, SIP सुद्धा करता येत आहे.

विशेष म्हणजे आता डिजिटल पेमेंट एप्लीकेशन च्या माध्यमातून ग्राहकांना कर्ज देखील मिळणार आहे. गुगल पे ने आता आपल्या ग्राहकांना 15 हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा सुरु केली आहे. गुगल इंडियाने देशातील छोट्या व्यापाऱ्यांसाठी ही सुविधा सुरू केली आहे.

गुगलने सांगितल्याप्रमाणे देशातील छोट्या व्यापाऱ्यांना अनेकदा छोट्या कर्जाची गरज भासत असते. हेच कारण आहे की, गुगलने आता छोट्या व्यापाऱ्यांना 15,000 पर्यंत कर्ज देण्याचे जाहीर केले असून या कर्जाची परतफेड छोट्या व्यापाऱ्यांना 111 रुपयाच्या सुलभ हप्त्याने करता येणार आहे.

यासाठी Google Pay ने DMI Finance कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. दरम्यान आता आपण गुगल पे चा वापर करून छोट्या व्यापाऱ्यांना कसे कर्ज मिळवता येऊ शकते, यासाठी कसा अर्ज करावा लागेल याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं मिळणार कर्ज

Google Pay ने कर्ज मिळवण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांना Google Pay For Business या एप्लीकेशन वर खाते ओपन करावे लागणार आहे.

कर्ज मिळवण्यासाठी गुगल पे फोर बिझनेस हे ॲप्लिकेशन उघडावे लागेल.

यानंतर एप्लीकेशन मधील लॉन्स या विभागात जा आणि तेथील ऑफर्स या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला लोन अमाऊंट निवडावी लागेल. यानंतर गेट स्टार्ट वर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला गुगल खात्यात लॉगिन करावे लागणार आहे. येथे तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे. या ठिकाणी तुम्हाला कर्जाची रक्कम आणि कालावधी ठरवावा लागणार आहे.

यानंतर मग कर्ज रिव्ह्यू करावे लागेल आणि ई-साईन करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे देखील द्यावे लागतील.

मग तुम्हाला EMI पेमेंटसाठी Setup eMandate किंवा Setup NACH वर क्लिक करावे लागेल आणि ही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला कर्ज मिळणार आहे. तुम्हाला मिळालेल्या या कर्जाची माहिती तुम्ही या अॅपच्या माय लोन सेक्शनमध्ये पाहू शकणार आहात.