Pune News : उद्घाटनानंतर अपघातांमुळे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या समृद्धी महामार्गावर मागील ९ महिन्यांत ४८ लाखांहून अधिक वाहने धावल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू असून इगतपुरी ते ठाणे या शेवटच्या टप्प्याचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
समृद्धी महामार्गावर नागपूर ते इगतपुरी दरम्यान मागील ९ महिन्यांत ४८ लाख वाहनांनी प्रवास केला.
मात्र या महामार्गावर ६७ वाहनांचे अपघात झाले असून १३५ जणांचा मृत्यू झाला. दोन मोठ्या अपघातांमुळे ३७ जणांचा मृत्यू झाला.
जुलै महिन्यात एका अपघातात मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बसला आग लागली, तर तीन दिवसांपूर्वीच महामार्गावरील अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आणि २३ जण जखमी झाले आहेत.
मात्र, अधिकाऱ्यांनी इतर महामार्गांवरील अपघातांच्या तुलनेत समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.
समृद्धी महामार्गावर वाहनांची सुरक्षितता सुधारण्यासाठी १५० किमी वेगमर्यादा निश्चित केली आहे.
वाहनांच्या वेगाची मर्यादा वाढली. एक्झिट टोलवर सायरनचा मोठा आवाज केला जातो आणि वेगाच्या उल्लंघनासाठी दंड आकारला जातो.
महामार्गावरील संमोहन टाळण्यासाठी दर १० किमी अंतरावर रंगीबेरंगी ध्वज लावले गेले आहेत