कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्युज ! कोकण रेल्वे मार्गावर सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं राहणार वेळापत्रक ? वाचा….

Konkan Railway News : दिवाळीचा सण मात्र 11 दिवसांवर येऊन ठेपला आहे. 12 नोव्हेंबर पासून यंदा दिवाळीचा सण सुरू होणार आहे. यामुळे बाजारात आत्तापासूनच गर्दी वाढू लागली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान दिवाळी सणाच्या पूर्वीच कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की उधना ते मंगळुरू दरम्यान दिवाळीच्या काळात विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही उधना ते मंगळुरु विशेष एक्सप्रेस ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर 3 नोव्हेंबर 2023 पासून अर्थातच येत्या दोन दिवसानंतर सुरू होणार आहे. तीन नोव्हेंबर पासून ही विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू होईल आणि 1 जानेवारी 2024 पर्यंत ही गाडी या मार्गावर चालवली जाणार आहे.

ही गाडी द्विसाप्ताहिक राहणार आहे. म्हणजेच या गाडीच्या आठवड्यातून दोन फेऱ्या होणार आहेत. मंगळुरू ते उदना ही गाडी 4 नोव्हेंबर पासून चालवली जाणार आहे. ही गाडी देखील आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे.

यामुळे दिवाळीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार असून यामुळे कोकणातील नागरिकांची दिवाळी गोड होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.

दरम्यान रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव जं., कानाकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.