10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होणारे ‘हे’ 3 व्यवसाय दिवाळीच्या काळात बनवणार मालामाल ! आजच सुरु करा, वाचा सविस्तर

Low Investment Business Idea Marathi : आपल्यापैकी अनेकांची व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत काही सुचत नाही. अशा परिस्थितीत आज आपण टॉप 3 बिझनेस प्लॅन बाबत माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर अलीकडे नोकरीऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले जात आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशा रुटीन कामामुळे आणि नोकरीतून मिळणाऱ्या पैशांमधून संसाराचा गाडा योग्य पद्धतीने चालत नसल्याने आता अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी नोकरीसोबतच व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. नोकरी सोबतच काहीतरी पार्ट टाइम व्यवसाय करण्याची अनेकांची इच्छा असते.

काहीजण तर नोकरी सोडून व्यवसाय करू लागले आहेत. जर तुम्हीही नोकरी सोबतच व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण कमी गुंतवणूकित सुरू होणाऱ्या टॉप तीन व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत.

कमी गुंतवणुकीत सुरू होणारे व्यवसाय

ज्यूस सेंटर : अलीकडे बाजारात ज्यूसची मागणी मोठी वाढली आहे. फक्त उन्हाळ्यातच नाही तर बारा महिने ज्यूसची मागणी असते. परंतु उन्हाळ्याच्या काळात ज्यूसला अधिक मागणी राहते. यामुळे हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही हा व्यवसाय मात्र दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीत देखील सुरू करू शकता. तुम्ही उसाचा, आंबा, चिकू यांसारख्या फळांचा ज्यूस बनवून हा दिवस तुमच्या सेंटरवर विकू शकता.

यातून तुम्हाला महिन्याकाठी सहजतेने पंधरा ते वीस हजार रुपयांची कमाई होऊ शकणार आहे. तुम्ही हा व्यवसाय फुल टाइम किंवा पार्ट टाइम करू शकता. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमची नोकरी सांभाळूनही हा व्यवसाय करता येऊ शकतो.

डान्स क्लासेस : जर तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर तुम्ही डान्स क्लासेस सुरू करून तुमच्या पॅशनला व्यवसायात परावर्तित करू शकता. या व्यवसायाचे सर्वात मोठे विशेषता म्हणजे तुम्ही तुमच्या घरातूनच डान्स क्लासेस सुरू करू शकता.

किंवा तुम्ही ऑनलाईन देखील डान्स ट्यूटर म्हणून तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला खूपच कमी गुंतवणूक करावी लागू शकते. अवघ्या पाच ते दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू होऊ शकतो.

कुकिंग क्लासेस : जर तुम्हाला उत्कृष्ट जेवण बनवता येत असेल तर तुम्ही तुमच्या या आवडीला व्यवसायाचे रूप देऊ शकता. तुम्ही कुकिंग क्लासेस सुरू करून तुमची आवड जोपासत यातून चांगले पैसे कमवू शकणार आहात.

कुकिंग क्लासेससाठी तुम्हाला खूपच कमी गुंतवणूक लागणार आहे. तुम्ही ऑनलाईन देखील तुमचा हा व्यवसाय सुरू करू शकता. तसेच तुम्ही युट्युबवर स्वतःचा चैनल सुरू करू शकता. यातूनही तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळू शकणार आहे.