राज्यातील रेल्वे प्रवाशांना मिळाली दिवाळी भेट ! ‘या’ मार्गावर सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या भागातील प्रवाशांना मिळणार फायदा ?

Maharashtra Railway : दिवाळी सणाला अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. येत्या चार दिवसात संपूर्ण देशात दिवाळीचा आनंददायी पर्व सुरू होणार आहे. नऊ तारखेपासून सुरू होणारा हा पर्व 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान या सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार आहे.

यामुळे मध्य रेल्वेने राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एका विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार अमरावती ते पुणे दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

ही गाडी नियमित चालवली जाणार नसून हंगामी कालावधीसाठी सुरू केली जाणार आहे. दिवाळी सणानिमित्त या मार्गावर ही हंगामी गाडी सुरू होणार असून याचा या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

वास्तविक, अमरावतीसहित संपूर्ण विदर्भातुन पुण्यात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे. दरम्यान या विदर्भवासियांसाठी मध्य रेल्वेने पुणे ते अमरावती दरम्यान दिवाळीच्या काळात विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता आपण ही गाडी केव्हा सुरू होईल आणि या गाडीचे वेळापत्रक कसे राहील तसेच ही गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबेल याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असेल वेळापत्रक ? 

मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, अमरावती-पुणे विशेष मेमू ट्रेन, गाडी क्रमांक ०१२०९ 5 ते 19 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी अमरावती दर रविवारी आणि बुधवारी म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस सुटणार आहे.

ही गाडी या संबंधित कालावधीत अमरावती येथून १२.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २.४५ वाजता पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पुणे-अमरावती विशेष मेमू ट्रेन, गाडी क्रमांक ०१२१० ही 6 ते 20 नंबर दरम्यान चालवली जाणार आहे.

ही मेमू या कालावधीमध्ये पूणे येथून दर गुरूवारी आणि सोमवारी म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस सुटणार आहे. या संबंधित कालावधीमध्ये ही गाडी पुणे येथून ०६.३५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे ०७.५० वाजता पोहोचणार अशी माहिती मध्ये रेल्वेने यावेळी दिली आहे.

कोणत्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा 

मध्य रेल्वेच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष मेमू ट्रेनला या मार्गावरील अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरळी, हडपसर आणि पुणे या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणारा आहे. यामुळे या संबंधित भागातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास दिवाळीच्या काळात अधिक गतिमान आणि आरामदायी होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.