Maharashtra Railway News : पुण्याला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपण सर्वजण ओळखतो. पुणे शहराचा विकास गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने झाला आहे.
ज्याप्रमाणे शहराचा विकास रॉकेटच्या स्पीडने होत आहे तेवढीच शहरातील लोकसंख्या देखील वाढत आहे. शहरात राज्यातील कानाकोपऱ्यातील नागरिक स्थायिक होत आहे. विदर्भातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या माहेरघरात स्थायिक झाले आहेत.
कामानिमित्त, शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे शहरात लाखो विदर्भवासीयांनी आपले बस्तान बसवले आहे. दरम्यान पुण्यात बस्तान बसवलेल्या याच विदर्भवासियांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर आली आहे.
खरंतर दिवाळीचा सण जवळ येत आहे यामुळे पुण्यातच स्थायिक झालेले हे विदर्भवासी आता दिवाळीच्या सणाला आपल्या गावाकडे माघारी परतणार आहेत. यामुळे या नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुणे ते नागपूर दरम्यान दिवाळीच्या काळात विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय झाला आहे. या गाडीचा फक्त नागपूर आणि विदर्भातील नागरिकांनाच फायदा होईल असे नाही तर ही ट्रेन अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी देखील फायद्याची ठरणार आहे.
कारण की या एक्सप्रेस ट्रेनला अहमदनगर येथे देखील थांबा दिला जाणार जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाने पुणे ते नागपूर दरम्यान एकेरी सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ही गाडी कालपासून अर्थातच पाच नोव्हेंबर 2023 पासून प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र ही गाडी हंगामी राहणार आहे. म्हणजेच ही गाडी नियमित धावणार नाही.
फक्त दिवाळीच्या काळातच ही गाडी सुरू राहणार आहे. दरम्यान या एकेरी एक्सप्रेस गाडीचा पुणे ते नागपूर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कस राहणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते नागपूर दरम्यान धावणारी गाडी क्रमांक 02107 विशेष एकेरी सुपरफास्ट ट्रेन पाच नोव्हेंबरला पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी चार वाजता रवाना होईल आणि सहा तारखेला 6:50 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच ही गाडी या मार्गावरील उरुळी, दौन्ड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव व वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी देखील माहिती मध्य रेल्वेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.