रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईला मिळणार तीन नवीन एक्सप्रेस गाड्यांची भेट, कसा असेल रूट ? वाचा सविस्तर

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राजधानी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी रेल्वे विभागाच्या माध्यमातून तीन नवीन एक्सप्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.

या विशेष एक्सप्रेस गाड्या उद्या अर्थातच 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी चालवल्या जाणार आहेत. यामुळे मुंबईमधील क्रिकेट प्रेमींसाठी हा निर्णय खूपच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान उद्या 19 नोव्हेंबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

भारताने यावर्षीच्या वर्ल्ड कप मध्ये लीग स्टेज मधील आपल्या सर्व मॅचेस जिंकल्या आहेत. तसेच सेमी फायनल मध्ये न्युझीलँड संघाला पराभूत करून भारताने फायनलचा टप्पा गाठला आहे. भारताकडे आता तिसऱ्यांदा वर्ल्डकप फायनल जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. तिकडे ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात थोडीशी निराशा जनक ठरली होती.

ऑस्ट्रेलियाने यंदा सुरुवातीच्या लीग स्टेज मधील दोन मॅच्या गमावल्या होत्या. पण सुरुवातीचे दोन सामने पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने स्ट्रॉंग कमबॅक केले आणि नंतरचे सर्व सामने जिंकत सेमी फायनल मध्ये दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघाला मात देत फायनलचे तिकीट कन्फर्म केले आहे.

ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा वर्ल्ड कप चा टायटल आपल्या नावावर करण्यासाठी भारताशी कडवी झुंज देण्यासाठी आता सज्ज झाला आहे. त्यामुळे उद्याचा सामना निश्चितच थरारक राहणार आहे यात नो डाउट. दरम्यान उद्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम मध्ये फायनल पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक येणार आहेत.

मुंबई मधूनही हजारोंच्या संख्येने क्रिकेट विश्वचषकाची फायनल पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी हजेरी लावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने मुंबईमधून तीन विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटी ते अहमदाबाद, वांद्रे टर्मिनस ते अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या तीन मार्गांवर क्रिकेट विश्वचषक विशेष एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे. आता आपण या तिन्ही गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सी एस एम टी अहमदाबाद विशेष एक्सप्रेस ट्रेन : ही विशेष गाडी सीएसएमटीहून शनिवारी रात्री १०.३० वाजता रवाना होईल आणि अहमदाबादला रविवारी पहाटे ६.४०ला पोहोचेणार अशी माहिती रेल्वेने दिली आहे. तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी अहमदाबादहून रविवारी मध्यरात्री १.४५ वाजता रवाना होईल आणि सोमवारी सकाळी १०.३५ला मुंबईत पोहोचणार असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

वांद्रे टर्मिनस ते अहमदाबाद विशेष एक्सप्रेस ट्रेन : क्रिकेट विश्वचषकासाठी सुरू करण्यात आलेली ही विशेष एक्सप्रेस गाडी वांद्रे टर्मिनसहून शनिवारी रात्री ११.३०ला रवाना होऊन अहमदाबादला रविवारी पहाटे ७.२० ला पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी अहमदाबादहून सोमवारी पहाटे ४ला रवाना होईल आणि त्याचदिवशी दुपारी १२.१०ला वांद्रे टर्मिनसमध्ये पोहोचणार असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद विशेष एक्सप्रेस ट्रेन : रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट विश्वचषकासाठी सुरू करण्यात आलेली ही विशेष एक्सप्रेस ट्रेन मुंबई सेंट्रलहून शनिवारी रात्री ११.५५ ला रवाना होऊन अहमदाबादला रविवारी ८.४५ ला पोहोचणार आहे.  तसेच परतीच्या प्रवासाचा विचार केला तर ही गाडी अहमदाबादहून सोमवारी पहाटे ६.२० ला रवाना होईल आणि त्याचदिवशी दुपारी २.१० ला मुंबई सेंट्रल येथे पोहोचणार आहे.