Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खर तर सध्या संपूर्ण देशात दिवाळीचा मोठा सण साजरा केला जात आहे. दिवाळी सणाला शहरातील नागरिक आपल्या गावाकडे परतत आहेत.
लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज सणाला गावाकडे लाखो नागरिक प्रवास करत आहेत. त्यामुळे रेल्वेमध्ये मोठी गर्दी वाढली आहे. दरम्यान गर्दीच्या कालावधीतच रेल्वे प्रवाशांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे महाराष्ट्रातून धावणाऱ्या सात एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात एक मोठा बदल झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो असे चित्र तयार होत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी ब्लॉक घेतला जाणार आहे. मडगाव – कुमठा या विभागात तीन तासांचा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्ग या विभागात अडीच तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.
या ब्लॉगच्या पार्श्वभूमीवर या रेल्वे मार्गावरील सात एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. काही एक्सप्रेस गाड्या अंशता रद्द देखील होणार आहेत.
अशा परिस्थितीत आता आपण या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील कोणत्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल आणि कोणत्या गाड्या अंशता रद्द होतील याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मडगाव-कुमठा विभागात घेतल्या जाणाऱ्या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मंगळुरू सेंट्रल-मडगाव जंक्शन ही १६ नोव्हेंबर रोजी कुमठा स्थानकापर्यंतच धावणार आहे. म्हणजे ही गाडी थेट मडगाव पर्यंत धावणार नाही. कुमठा ते मडगाव विभागादरम्यान ही गाडी अंशत: रद्द केली जाणार आहे.
तसेच मडगाव जंक्शन-मंगळुरू सेंट्रल ही गाडी १६ नोव्हेंबर रोजी कुमठा स्थानकातून नियोजित वेळेत सुरू होईल म्हणजे ही गाडी मडगाव जंक्शन वरून सुटणार नाही. अर्थातच या दिवशी ही गाडी मडगाव-कुमठा विभागादरम्यान अंशतः रद्द केली जाणार आहे.
याशिवाय, राजापूर रोड-सिंधुदुर्ग विभागा दरम्यान घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मडगाव जंक्शन-सावंतवाडी रोड ही गाडी 80 मिनिटे उशिराने धावणार आहे. तसेच यामुळे सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस ही गाडी २ तास ५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
याशिवाय, मुंबई सीएसएमटी या जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटांसाठी थांबवला जाणार आहे. तसेच मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन ही तेजस एक्स्प्रेस वीस मिनिटे उशिराने धावणार आहे.