महाराष्ट्रात पुढील 5 दिवस कस राहणार हवामान ? अवकाळी पाऊस हजेरी लावणार का ? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चेंज होत आहे. कधी ढगाळ हवामान, कधी अवकाळी पाऊस, तर कधी गुलाबी थंडी यामुळे सध्या हिवाळा सुरू आहे, पावसाळा सुरू आहे की हिवसाळा सुरू आहे हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

अशातच भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस कसे हवामान राहणार याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसला होता.

यामुळे काढणीसाठी तयार शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. एकतर आधीच मान्सून काळात समाधानकारक असा पाऊस पडलेला नसल्याने शेती पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.

अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने आधीच बेजार शेतकऱ्यांना आणखी बेजार करण्याचे काम केले आहे. परंतु हा अवकाळी पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरणार आहे.

तसेच या अवकाळी पावसामुळे करपण्याच्या अवस्थेत आलेल्या फळबागांना देखील फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. आता भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार की नाही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

वास्तविक, सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विशेष म्हणजे हे कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होणार आहे. तसेच हे चक्रीवादळ पुढे बांगलादेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ महाराष्ट्रात मात्र कोणताच विपरीत परिणाम घडवून आणणार नाही. महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे अवकाळी पाऊस बरसणार नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, रविवारी पश्चिम हिमानलयीन पर्वतीय क्षेत्रात पश्चिमी झंजावाताच्या परिणामामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील IMD कडून वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार आहे.

एकंदरीत, महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाहीये पण काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. म्हणजे राज्यात आता पाऊस पडणार नसून हळूहळू गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे.

गुलाबी थंडी ज्या ठिकाणी रब्बी हंगामाची पेरणी झाली आहे त्या पिकांसाठी मोठी फायदेशीर ठरेल आणि पीक वाढीस मदत करेल असे मत कृषी तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.