अर्ध्या किमतीत मिळतेय महिंद्रा बोलेरो, जाणून घ्या भन्नाट ऑफर

मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्सपर्यंत सर्वच कंपन्यांच्या एसयूव्ही लोकप्रिय आहेत. एसयूव्ही सेगमेंट कारची क्रेझ सध्या तरुणांमध्ये दिसत आहे.

महिंद्रा बोलेरो ही एसयूव्ही सध्या शहरांत तसेच ग्रामीण भागात सर्वाधिक पसंती केली जाते. महिंद्रा बोलेरोची किंमत 9.79 लाख रुपयांपासून सुरू होते.

त्याचे टॉप मॉडेल 10.80 लाख रुपयांपर्यंत जाते. बऱ्याच लोकांना या एसयूव्हीच्या जास्त किंमतीमुळे बजेट कमी पडते व ती खरेदी करता येत नाही.

कमी बजेटमुळे तुम्ही खरेदी करू शकत नसाल तर ही बातमी आवश्य वाचा. येथे आम्ही तुम्हाला SUV च्या सेकंड हँड मॉडेल्सवर उपलब्ध ऑफरचे तपशील ज्यात तुम्हाला त्या अर्ध्याहून कमी किमतीत मिळू शकतात त्याविषयी माहिती देणार आहोत.

सेकंड हँड महिंद्रा बोलेरो

महिंद्रा बोलेरोची पहिली आणि स्वस्त ऑफर ओएलएक्स वेबसाइटवर उपलब्ध आहे, जिथे बोलेरोचे 2016 मॉडेल विक्रीसाठी आहे. या एसयूव्हीची किंमत ४ लाख रुपये ठेवली असून ती खरेदी केल्यानंतर फायनान्स प्लॅनची सुविधा देखील मिळणार आहे.

युज्ड महिंद्रा बोलेरोवरील ऑफरमधील दुसरी सर्वात स्वस्त डील DROOM वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे दिलेले बोलेरोचे 2017 चे मॉडेल आहे. या एसयूव्हीची किंमत विक्रेत्याने 5.5 लाख रुपये ठेवली आहे आणि ती खरेदी केल्यावर फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध असेल.

महिंद्रा बोलेरो सेकंड हँड मॉडेलवर उपलब्ध असलेली तिसरी आणि शेवटची बजेट फ्रेंडली डील CARTRADE वेबसाइटवर उपलब्ध आहे. 2018 चे हे मॉडेल आहे. 6.7 लाख रुपये किमत या एसयूव्हीची ठेवलेली आहे. खरेदीवर सुलभ हप्त्यांसह फायनान्स प्लॅनदेखील आहे.

महिंद्र बोलेरोच्या सेकंड हँड मॉडेल्सवर उपलब्ध असलेल्या या ऑफरचे तपशील वाचल्यानंतर, तुम्ही तुमचे बजेट आणि प्राधान्य लक्षात घेऊन कोणताही पर्याय खरेदी करू शकता. परंतु कोणतीही सेकंड हँड कार ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तिची खरी स्थिती तपासली पाहिजे, अन्यथा पैसे भरल्यानंतर कारमध्ये काही दोष आढळल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.