मोठी बातमी ! मोदी सरकार पुन्हा 1 हजाराची नोट सुरू करणार ? महत्वाची अपडेट समोर

Modi Government : मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक महत्त्वाचे आणि काही धक्कादायक असे निर्णय घेतले आहेत. यामध्ये नोटाबंदीचा निर्णय सर्वात शॉकिंग होता. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 2016साली एक शॉकिंग निर्णय घेतला आणि चलनातील 500 आणि 1000 रुपयाची नोट बंद करण्याचे जाहीर केले.

विशेष म्हणजे डीमॉनिटायझेशनचा निर्णय हा खूपच अचानक घेण्यात आला होता. या निर्णयाची कोणालाच कल्पना नव्हती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना डीमॉनेटायझेशन नंतर खूपच अडचणींचा सामना करावा लागला होता. नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण देखील पाहायला मिळाले होते. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय हा देशाच्या हिताचा असल्याचा दावा केला होता.

डिमोनेटायझेशन अर्थातच नोटाबंदी करून मोदी सरकारने काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवादाला आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आणि नवीन पाचशे आणि दोन हजार रुपयाची नोट बाजारात आणली.

दोन हजार रुपयाची नोट आता पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 मे 2023 रोजी 2 हजार रुपयाची नोट चलनातून बाद करण्यात आली आहे. अस सांगितलं जात आहे की बाजारात दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्याने केंद्रातील मोदी सरकारने दोन हजार रुपयाची नोट चलनातून बाद केली आहे. मात्र अशातच आता एका नवीनच चर्चेला उधाण येत आहे.

ती म्हणजे केंद्र सरकारने ₹2000 ची नोट बंद केली असल्याने आता बाजारात पुन्हा एकदा नव्याने एक हजार रुपयांची नोट येणार आहे. खरंतर, सध्या स्थितीला देशात पाचशे रुपयाची नोट सर्वात मोठी नोट आहे. यामुळे चलनात लवकरच एक हजार रुपयाची नोट येऊ शकते असा दावा आणि चर्चा विविध ठिकाणी होऊ लागली आहे.

अनेकांना मोदी सरकार लवकरच हजार रुपयाची नोट सुरू करणार असल्याचे वाटत आहे. दरम्यान, आज आपण सर्वसामान्यांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोदी सरकार खरंच पुन्हा एकदा एक हजार रुपयाची नोट चलनात आणेल का ? हा सर्वसामान्यांचा प्रश्न आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया.

वास्तविक, एक हजार रुपयाची नोट केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सुरू करेल की नाही याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ANI वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. ANI ने RBI च्या हवाल्याने याबाबत अपडेट दिली आहे. सदर अपडेटनुसार हजार रुपयाची नोट पुन्हा बाजारात आणण्याबाबत आरबीआयचा कोणताही विचार नाहीये. परंतु आरबीआयने याबाबत अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही.

सूत्रांच्या माध्यमातून हे वृत्त समोर आले आहे. सदर सूत्रांवर जर विश्वास ठेवला तर तूर्तास तरी केंद्र सरकारचा तसेच आरबीआयचा एक हजार रुपयाची नोट पुन्हा सुरू करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट होत आहे. पण याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.