महाराष्ट्र अवैधरित्या सावकारकीवरती बंधने असली तरी पिंपरी चिंचवड शहरात अवैधरित्या सावकारकी फोफावताना दिसून येत आहे.
याची पोलीस प्रशासनाकडे कोणतीच माहिती नसून शहरात सावकारकीचा नवा ट्रेंड पहायला मिळत आहे.
यासाठी घर ना जमीन ना जागा गहाण ठेवता चार चाकी अथवा दोन चाकी गाड्या गहाण ठेवून कर्जदारास पैसे दिले जात आहेत.
याच्या बदल्यात अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारले जात आहे.. गहाण ठेवलेल्या गाड्या या विनानंबर प्लेट सर्रासपणे शहरात हे सावकार वापरताना दिसून येतात.
गहाण ठेवलेल्या गाड्या या स्व-मालकीच्या असतात किंवा इतर कुठल्यातरी अवैधरीत्या चोरीच्या गाड्या गहाण ठेवून याचा वापर अवैध धंदे करण्यासाठी तर होत नाही ना याचा तपास करणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या दिवसेंदिवस दोन चाकी आणि चार चाकी गाड्या चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेले असून,
अशा गाड्या काही स्वस्तात परराज्यात विकल्या जातात अथवा नंबर प्लेट काढून अनधिकृतपणे सावकाराकडे गहाण ठेवल्या जातात. सावकाराकडे गहाण ठेवलेल्या गाड्यांच्या रकमेवरती अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारले जाते.
त्यामुळे कर्जदारास त्या गाड्या लवकर सोडवता येत नाहीत. पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावरती जरी अंकुश असला तरी चोरी,
दरोडे, मारामारी या घटना सातत्याने पिंपरी चिंचवड शहरात होत असतात, अशा घटनांमध्ये वापरलेल्या गाड्या ह्या चोरीच्या अथवा बिना नंबर प्लेट किंवा सावकाराकडे गहाण ठेवलेल्या गाड्य तर नाहीत ना हे पाहणे गरजेचे आहे.
■पिंपरी चिंचवडच्या ज्या ज्या हद्दीमध्ये अशा विना नंबर प्लेट किंवा ब्लॅक फिल्मिंग च्या गाड्या रस्त्यावरती धावत असतील किंवा जेथे उभा केल्या असतील अशा भागात वाहतूक विभागाकडून गस्त घालून त्या गाड्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग
■पिंपरी चिंचवड परिसरामध्ये अशा अवैधरीत्या सावकारावरती नक्कीच कारवाई केली जाईल. गाडी गहाण ठेवून पैसे देणे हा खरं तर कायद्याने गुन्हा आहे आणि जर काही घटना घडत असतील आणि तक्रारदार जर आमच्यासमोर आले तर नक्कीच अशा सावकारावरती गुन्हे दाखल केले जातील. – सतीश माने, सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा.