आजच्या युगात कोण- कोणाला मदत करत नाही, रक्ताचे नाते कामी येत नाही, तिथे गिरीममधील सासू एका सुनेसाठी परमेश्वर बनून आली आहे.
सध्या दररोजच्या जीवनात सासू सुनेचा कलह, छळ यांच्या बातम्या वाचतो, घटना पाहतो. पण, गिरीम गावातील या सासूने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
ही कहाणी आहे. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील गिरीममधील एका सर्वसामान्य कुटुबातील एका युवा उद्योजकाच्या कुटुंबातील २१ व्यक्तीचे एकत्र कुटुंब असलेल्या जाधव कुटुंबातील मोठा मुलगा पांडुरंग यांची पत्नी वैशाली या वर्षभरापासून हात पाय गुजणे व दम लागणे,
या त्रासाने उद्विग्न होत्या. जाधव कुटुंबीयांनी त्यांची तपासणी केल्यावर सर्व कुटुंबाच्या पाण्याखाली जमीनच सरकली.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, वैशाली यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत, त्यांना डायलेसिस करावा लागेल आणि किडनी प्रत्यारोपण करावे लागेल.
यामुळे सर्व जाघव परिवार चिंतेत होता. घरातील कर्ता मुलगा आणि त्याच्या पत्नीला आजार झाल्यामुळे सर्व कुटुंब उद्विग्न झाले.
प्रसिद्ध किडनी तज्ञ डॉ. सूर्यभान भालेराव व डॉ. शैलेश काकडे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी किडनी बदलण्याचा सल्ला दिला. डॉ. प्रसाद कोल्हे,
डॉ. उदय शेलार मार्गदर्शन घेऊन पुण्यातील मोठ्या रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
तोपर्यंत आठवडयात दोनवेळा डायलेसिस करावा लागेल, किडनी कोण देणार, यासाठी धावपळ सुरू झाली,
आई- वडील दौर हे सर्व किडनी देण्यासाठी पुढे आले. दरम्यान, पांडुरंग जाधव म्हणाले, माझ्या पत्नीला मी किडनी देतो,
परंतु, आईचा जीव कसा कुणाला कळला, पांडुरंग जाधव यांची आई द्रोपदाबाई स्वतः पुढे आल्या.
माझ्या लेकाची बायको आहे. हीच नर वेळ माझ्या मुलीवर आली असती तर मी दिली नसती का, असे म्हणून मोठ्या मनाने माझी किडनी मी माझ्या सुनेसाठी देते, असे सांगितले.
योगायोगाने किडनीही मॅच झाली. द्रोपदाबाई यांचे वय ६८, या वयात किडनी प्रत्यारोपण करणे खूप किचकट प्रक्रिया असेत,
त्यात सर्व तपासण्या केल्यानंतर द्रोपदाबाई यांचा फिटनेस चांगला आला. आरोग्यदूत आ. राहुल कुल,
कार्यकर्ते नंदू पवार, मनोज जाधव यांनी खूप मोलाची मदत केली. डॉ. भालेराव व डॉ. काकडे यांनी यशस्वीरित्या किडनी प्रत्यारोपण केली.
या रुग्णालयातीलही पहिलीच केस आहे की, सासुने सुनला किडनी देणे, असे बोलताना दोन्ही डॉक्टर भावूक झाले.
व्यवसाय करताना पैसा कमावणे महत्त्वाचे नाही, त्यासोबत ऋणानुबंध निर्माण करावे लागतात, याची प्रचिती मला आली. सोबत एकत्र कुटुंबाची साथ, सर्व मित्र परिवारांनी केलेल्या सहकार्याच्या जोरावर आज माझी पत्नी व माझी आई, दोघीही सुखरूप आहेत. – पांडुरंग जाधव, पती, उद्योजक, गिरीम, ता. दौंड
ही सासू नसून माझी आई आहे. मी माझ्या जीवनात परमेश्वर पहिला नाही, पण माझ्या सासूच्या रूपाने मी देव पाहिला.
माझे सर्व आयुष्य माझ्या सासूसाठी अर्पण करते. समाजात सर्वांना जर माझ्या सासूसारख्या सासू भेटली तर त्यांनी स्वतःला पुण्यवान समजावे.
माझी सासू माझ्यासाठी दुसरी जीवनदायनी ठरली आहे.-वैशाली पांडुरंग जाधव, द्रोपदाबाईची सून
आमचे २१ जणांचे कुटुंब आहे. मुलगा पांडुरंगला दोन लहान मुले आहेत, सुनेच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ती घरात रडायची,
भरलं गोकुळ असे रडताना मला पाहत नव्हतं. नशीब. कोरोनामुळे जगलो वाचलो, आता काय नातवंडे, | लेक सुनासाठी जगायचे.
मी काय आज आहे आणि उद्या नाही, त्यामुळे मी माझ्या सुनेसाठी किडनी दिली – द्रोपदाबाई जाधव, आदर्श सासू