एसटी महामंडळात नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी निघाली भरती, 10वी पास राहणार पात्र, आजच करा अर्ज, वाचा सविस्तर

MSRTC Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्या तरुणांना एसटी महामंडळात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी सोने पे सुहागा अशी राहणार आहे.

कारण की, राज्यातील एसटी महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत काही रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे जर तुम्हीही एसटी महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर  तुमच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी राहणार आहे.

दरम्यान, एमएसआरटीसीने भरतीसाठीची अधिसूचना निर्गमित केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागविले जात आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्या पदासाठी होणार भरती?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत चालक तथा वाहक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती

या पदभरती अंतर्गत चालक तथा वाहक पदाच्या रिक्त असलेल्या 50 जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी किमान दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. सोबतच उमेदवाराकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील आवश्यक आहे. तथापि याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा खाली दिलेली अधिसूचना वाचावी.

अर्ज कसा करायचा आहे

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून मा. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, दक्षता पेट्रोल पंप समोर, पालेशा कॉलेज जवळ, संतोषी माता मंदिर रोड, धुळे ता. जि. धुळे : ४२४ ००१ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

23 ऑक्टोबर 2023 पर्यंत या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दिलेल्या मुदतीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यानंतर सादर झालेल्या अर्जावर विचार होणार नाही याची नोंद घ्यायची आहे.

जाहिरात कुठे पाहणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे भरती 2023 या लिंकवर जाऊन या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.