मुंबईत नोकरीची संधी ! ‘इथं’ निघाली स्वच्छता निरीक्षक पदासाठी भरती, 12वी पास उमेदवार राहणार पात्र, पगार मिळणार दरमहा 25,000

Mumbai Government Job : सणासुदीच्या काळात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्या तरुणांना राजधानी मुंबईत नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी मोठी खास राहणार आहे.

खरंतर, मायानगरी मुंबईमध्ये नोकरी असावी असे लाखो तरुणांचे स्वप्न असते. जर तुमचेही मुंबईमध्ये काम करण्याचे स्वप्न असेल तर मुंबई महापालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी एक भरती आयोजित करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात Sanitation Inspector म्हणजे स्वच्छता निरीक्षक या पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या मुदतीत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

या पदभरती अंतर्गत सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सॅनिटेशन इन्स्पेक्टर म्हणजेच स्वच्छता निरीक्षक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

या पदभरती अंतर्गत स्वच्छता निरीक्षक या पदाच्या रिक्त असलेल्या दहा जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण उमेदवार तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा किंवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा धारक उमेदवार पात्र राहणार आहेत. दरम्यान, उमेदवाराने मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या पदासाठी 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.

नोकरी कुठे करावी लागेल?

या भरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय येथे नोकरी करावी लागणार आहे.

किती पगार मिळणार?

सॅनिटेशन इन्स्पेक्टर पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रति महिना 25 हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

यासाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आवक / जावक विभाग, शीव या पत्त्यावर आपला अर्ज दिलेल्या मुदतीत पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक 

या भरतीसाठी 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवता येणार आहे. या भरतीसाठी विहित मुदतीत अर्ज करायचा आहे. मुदत संपल्यानंतर सादर झालेल्या अर्जावर कुठल्याही सबबीवर विचार होणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

भरतीची जाहिरात कुठे पाहणार

https://drive.google.com/file/d/1rm6fp1pTkZWese0DVKQ-GBYkMtxb9m2E/view?usp=sharing या लिंक वर या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.