गुड न्युज ! मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदासाठी निघाली भरती, कोण राहणार पात्र, कुठं करणार अर्ज ? वाचा..

Mumbai High Court Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि सणासुदीच्या दिवसात आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्या संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. पुढील महिन्यात दिवाळीचा सण देखील राहणार आहे.

एकंदरीत भारतात सध्या सणासुदीचा हंगाम आहे. दरम्यान, या सणासुदीच्या हंगामात नोकरीच्या शोधात असलेल्या विशेषता मुंबईत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.

ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात काही रिक्त जागांसाठी एक भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कोणत्या पदासाठी होणार भरती ?

अधिसूचनेनुसार, या पदभरती अंतर्गत डिस्ट्रिक्ट जज म्हणजेच जिल्हा न्यायाधीशाच्या आणि सीनियर सिविल जज म्हणजेच वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती पदासाठी होणार भरती ?

मुंबई हायकोर्ट अंतर्गत या पदभरती अंतर्गत एकूण 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये जिल्हा न्यायाधीशाच्या 4 आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशाची एक रिक्त जागा भरली जाणार आहे.

आवश्यक पात्रता

जिल्हा न्यायाधीश या पदासाठी जिल्हा न्यायाधीशांच्या संवर्गातील 30 सप्टेंबर 2020 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायिक अधिकारी पात्र राहणार आहेत. वरिष्ठ दिवानी न्यायाधीश या पदासाठी जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी पात्र राहणार आहेत.

अर्ज कसा करावा लागणार ?

यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. [email protected] या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई, 400032 या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज पाठवता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तथापि विहित मुदतीत ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. विहित मुदतीनंतर सादर झालेल्या अर्जावर विचार होणार नाही याची नोंद घ्यायची आहे.