Namo Shetkari Yojana : नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरंतर, सध्या रब्बी हंगामातील पीक पेरणीची लगबग पाहायला मिळत आहे.
रब्बी हंगामातील पिक पेरणीसाठी शेतकरी आपल्या परिवारासमवेत शेतशिवारात राबतोय. यामुळे शेतकऱ्यांना सध्या पैशांची निकड आहे. अशातच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.
पण शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळणार हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. खरंतर पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे वितरित केले जातात.
पीएम किसानचा मागील 14 वा हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला होता. म्हणजेच 14 वा हप्ता जमा करून आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. यामुळे आता या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
तथापि, नियमानुसार या योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी आणखी एका महिन्याची वाट पहावी लागणार आहे. परंतु पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. शिवाय येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाकडून लवकरात लवकर हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये पीएम किसान योजनेचा पुढील हक्का म्हणजेच पंधरावा हप्ता हा दिवाळीच्या पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.
तथापि याबाबतची पुष्टी केंद्र शासनाकडून करण्यात आलेली नाही. केंद्र शासनाने औपचारिकपणे याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. शिवाय पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
परंतु दिवाळी सणामुळे आणि आगामी लोकसभेच्या तसेच विधानसभेच्या निवडणुका पाहता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाकडून पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता हा दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. यामुळे आता या योजनेचा पंधरावा हफ्ता खरच दिवाळीपूर्वी मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.