Pune Crime : स्क्रॅप व्यवसायात पैसे गुंतवणूक करण्यास सांगून महिलेकडून एकाने दोन लाख रुपये घेतले,
त्यानंतर महिलेला पुणे स्टेशन येथे सोडण्याच्या बहाण्याने बुधवार पेठेतील रेडलाइट एरियामध्ये नेले.
तेथे महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून लाखो रुपये उकळले.
याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष दत्तात्रय पवार (३६. रा. वेण्णा चौक, मेढा, जावली, (सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पवार आणि फिर्यादी महिलेची ओळख सोशल मीडियावर झाली. संतोषने महिलेला स्क्रॅप व्यवसायात पैसे गुंतवणूक करण्यास सांगून दोन लाख रुपये घेतले.
संबंधित महिला या पुण्यात आल्या असता संतोषने त्यांना बुधवार पेठेत नेले. तेथे महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन लाख रुपयांची मागणी केली.