पीएम किसानचा 15वा हफ्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का ? समोर आली मोठी अपडेट, वाचा सविस्तर

Pm Kisan Yojana Latest Update : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहेत.

मात्र ही रक्कम शेतकऱ्यांना एक रक्कमी न देता दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने वार्षिक तीन हफ्त्यात वितरित केली जात आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांचे या योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळणार याकडे लक्ष लागून आहे.

जर तुम्हीही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर, या योजनेचा मागील 14 वा हप्ता हा जुलै महिन्यात वितरित करण्यात आला होता. 14 वा हप्ता वितरित होऊन आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

मागील हप्ता हा 27 जुलैला वितरित झाला होता. दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता मिळतो. यामुळे या योजनेचा पुढील हप्ता नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. 12 नोव्हेंबर पासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे.

यामुळे दिवाळीच्या काळात या योजनेचा पुढील हप्ता मिळणार का ? हा देखील सवाल शेतकऱ्यांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच बाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच पंधरावा हप्ता हा दिवाळीच्या पूर्वीच शेतकऱ्यांना मिळू शकतो असा दावा करण्यात आला आहे.

या योजनेचा मागील हफ्ता जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. यामुळे या योजनेचा पंधरावा हप्ता देखील देशातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांना मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हा हफ्ता दिवाळीच्या पूर्वीच शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.

परंतु याबाबत शासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील या योजनेच्या पुढील हत्याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.

पण दिवाळीचा मोठा सण जवळ येत असल्याने या योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांना वितरित होऊ शकतो असे चित्र तयार होत आहे. दरम्यान, या योजनेचा पुढील हप्ता जर मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना बँक खात्यासोबत आधार लिंक करावे लागणार आहे. याशिवाय केवायसीची प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागणार आहे.