पुणेकरांसाठी गुड न्यूज ! मेट्रो मार्ग 3 च्या कामाला गती, लवकरच पूर्ण होणार काम, ‘या’ भागातील 4 लाख लोकांना मिळणार फायदा

Pune Metro News : पुणे शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. ते म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक. या दोन मेट्रो मार्गांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. मोदींनी या मार्गाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पुणेकरांनी मेट्रोला भरभरून असे प्रेम दिले आहे.

मेट्रोने दररोज 60 ते 65 हजार पुणेकर प्रवास करत आहेत. महामेट्रोच्या या दोन्ही मार्गांना पुणेकरांनी चांगला उदंड प्रतिसाद दाखवला असल्याने या मार्गांचे विस्तारित मार्गांच्या कामाला देखील गती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वनाज ते रुबी हॉल क्लिनिकचा पुढील टप्पा म्हणजे रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाचे काम देखील पूर्ण झाले आहे.

या मार्गावर नुकत्याच काही दिवसांपूर्वी ट्रायल रन देखील यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे आता वनाज ते रामवाडी पर्यंत थेट metro ने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. दरम्यान रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रोचे येत्या काही महिन्यात उद्घाटन होण्याची शक्यता आहे. हा मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

अशातच आता पुणेरी मेट्रोबाबत म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या मेट्रो मार्ग 3 बाबत देखील एक महत्त्वाची माहिती समोर आहे. खरंतर मेट्रो मार्ग तीन अंतर्गत आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेले हिंजवडी ते शहराचे मध्यवर्ती ठिकाण शिवाजीनगर परस्परांना कनेक्ट केले जाणार आहे.शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान हा मार्ग विकसित केला जाणार आहे.

दरम्यान या प्रकल्पाचा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकताच आढावा घेतला आहे. वास्तविक, शिवाजीनगर हे शहरातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि हिंजवडी हे एक प्रमुख आयटी पार्क आहे. हिंजवडीमध्ये मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातून हिंजवडी येथे दररोज हजारो कर्मचारी कामासाठी जात असतात.

अशा स्थितीत हा मेट्रो मार्ग शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गामुळे जवळपास चार लाख प्रवाशांना फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे. हेच कारण आहे की चंद्रकांत पाटील यांनी या मार्गाचा नुकताच आढावा घेतला असून या मार्गाच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल असा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे.

खरंतर हा मेट्रो मार्ग 24 किलोमीटर लांबीचा आहे. त्यासाठी तब्बल 8313 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग पुण्यातील शिवाजीनगर या मध्यवर्ती ठिकाणाहून सुरू होतो आणि विद्यापीठमार्गे बाणेर, वाकड, हिंजवडी ते माणपर्यंत जातो. या मार्गावर एकूण 23 मेट्रो स्टेशन विकसित केली जात आहेत.

मेगा पोलीस सर्कल, एम्बॉसिं क्वाड्रान बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज टू, विप्रो फेज टू, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, NICMAR, रामनगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी नगर, सकाळ नगर, विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय या स्थानकांचा या मेट्रो मार्गात समावेश करण्यात आला आहे.

निश्चितच शहरातील मध्यवर्ती भागातून हिंजवडी येथे कामानिमित्त ये-जा करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांसाठी हा मेट्रोमार्ग खूपच फायदेशीर ठरणार आहे. मार्गाचा शहरातील जवळपास चार लाखांहून अधिक प्रवाशांना फायदा होणार आहे. यामुळे महा मेट्रोच्या दोन्ही मेट्रो मार्गांना जेवढा प्रतिसाद मिळाला तेवढाच प्रतिसाद या मेट्रोमार्ग 3 प्रकल्पाला देखील मिळेल असा आशावाद जाणकार लोकांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आला आहे.