विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पुणे मेट्रो सेवा २० मिनिटे खंडित

वनाज ते रुबी हॉल या मार्गावरील पुणे मेट्रोची सेवा शुक्रवारी (दि. १३ ऑक्टोबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास २० मिनिटे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विस्कळीत झाली होती.

सेवा विस्कळीत झाल्याने पुणे मनपा व वनाजकडे जाणाऱ्या कामगारांची तारांबळ उडाली गेल्या काही आठवड्यांपासून पुणे मेट्रोच्या मार्गात सध्या तात्रिक बिघाडाचा खोडा सुरू आहे.

मागील सलग दोन दिवसांत मेट्रो सेवा काही काळ बंद पडली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

रुबी हॉल से बना मार्गावरील मेट्रो सेवा मंगळवारी (दि. ३) अचानक अर्धा तास खंडित झाली होती.

या मार्गावरील मेट्रो २१ मिनिटे नळस्टॉप स्थानकावर थांबून होती. मेट्रोच्या ओव्हरहेड केबलला पक्षी धडकल्याने वीजपुरवठा खंडित होऊन सेवा बंद झाल्याचे समोर आले होते.

त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ४) मेट्रोच्या गाडीत तांत्रिक बिघाड झाला. गाडी दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने आली;

परंतु तो अतिशय संथगतीने आली. प्रवाशांनी आतमध्ये जाण्यासाठी दरवाजासमोर गर्दी केली परंतु, ते उघडले नाहीत.

अखेर काही वेळाने दरवाजे उघडता मेट्रो पुढे गेली. त्यानंतर काही मिनिटांनी आलेल्या दुसन्या मेट्रोने प्रवाशांना प्रवास करावा लागला. मेट्रोची विस्तारित सेवा सुरू झाल्यापासून वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत.

महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे म्हणाले, महापारेषण कंपनीकडून होणारा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शुक्रवारची सेवा ही २० मिनिटे बंद पडली होती.

यापूर्वीही काही ठिकाणी जिथे विवाह झाला असेल, तिथे तातडीने पोहोचून दुरुस्ती करतात.

तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच्या कारणांची चौकशी केली जाते. मात्र, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सेवा बंद ठेवणे भाग पडले.