पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागात तयार होतोय नवीन उड्डाणपूल, वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

Pune News : पुणे शहरात गेल्या काही दशकांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहतूक कोंडी पुण्यात आता कॉमन गोष्ट बनली आहे. यामुळे पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासनाकडून आणि प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये राज्य रस्ते विकास महामंडळांकडून पुणे रिंग रोड तयार केला जात आहे. पीएमआरडीएकडून देखील पुणे रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.

याशिवाय, पीएमआरडीएने शहरातील गणेश खेड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देखील एक मोठे काम हाती घेतले आहे. पीएमआरडीएकडून या भागात एक उड्डाणपूल विकसित केला जात आहे. सध्या या उड्डाणपुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

या ठिकाणी दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू असून येत्या काही महिन्यांमध्ये हा उड्डाणपूल प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. या रस्त्यावर मेट्रो आणि उड्डाणपूल एकमेकांशी संलग्न राहणार आहेत.

कसा असेल दुमजली उड्डाणपूल ? 

हा दुमजली उड्डाणपूल या भागातील वाहतूक कोंडी कायमची सोडवणार आहे. हा पूल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयापासून सुरु होणार आहे. पुढे हा उड्डाणपूल विद्यापीठ चौकातून जाईल आणि औंध, बाणेर, पाषाण अशा तीन बाजूंना उतरणार आहे. हा उड्डाणंपुल 1.7 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.

पुलाची लांबी दोन्ही बाजूंनी समान राहणार आहे. तसेच हा पूल 23 मीटर रुंदीचा आहे. सध्या या पुलाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे हा पूल ऑगस्ट 2024 पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार आहे.

शासनाकडून तशा सूचनाच संबंधितांना देण्यात आल्या आहेत. यामुळे सध्या या पुलाचे युद्ध पातळीवर काम सुरू असून येत्या काही महिन्यात हा पूल पूर्णपणे बांधून तयार होणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.

या पुलाचे 15 ऑगस्ट 2024 रोजी उद्घाटन केले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे आता या पुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होते का हे पाहण्यासारखे राहणार आहे.