Pune News : बारामती शरद पवारांकडून काढून घ्यायची ! बारामतीत खासदार भाजपचाच असणार, पहा ‘त्या’ बैठकीत काय ठरलंय

आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यात. भाजप तर सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय पक्ष मतदारसंघ निहाय तयारी करत आहेत.

उमेदवारांची छाननी केली जात आहे. आता भाजपने ‘मिशन 2024’ सुरू केले आहे. परंतु भाजपने जास्त लक्ष बारामतीत केंद्रित केलं आहे. शरद पवारांना शह देण्यासाठी व सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

अजित पवार सोबत असल्याने भाजपने बारामतीत खासदार भाजपचाच असणार या हिशोबाने तयारी करण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत.

2024 चा बारामती लोकसभेचा खासदार भाजपचा असेल, मिशन बारामतीसाठी आपण सगळ्यांनी सज्ज रहा, भारतीय जनता पार्टी निवडणुकीसाठी सज्ज आहे, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे इंदापूर येथे आयोजित सुपर 100 पदाधिकारी कार्यकर्ते बैठकी प्रसंगी म्हणाल्या.

भाजपची बैठक
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथे भाजपच्या सुपर 100 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बारामतीसाठी विशेष तयारी सुरु केली आहे.
त्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते घरोघरी पोहोचणार आहेत.

केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की, महाविजय २०२४ अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लवकरच बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी धाडसी निर्णय घेतले आहेत. आगामी सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजप 300 प्लस जागा जिंकणार असून,

बारामती लोकसभा मतदारसंघाचा आगामी खासदार भारतीय जनता पार्टीचा असेल, असा विश्वास पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केला.
अंकिता पाटील म्हणाल्या की, बारामती मतदारसंघातील पुढचा खासदार भाजपचाच असेल. मिशन बारामतीसाठी भाजप सुसज झालंय. त्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचा तालुकानिहाय आढावा घेतला जातोय.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील 100 पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यापासून भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत केले आहे.