Pune News : हडपसरसाठी लवकरच ५०० बेडचे अद्ययावत रुग्णालय

दुर्गम डोंगरी भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील खानापूरमधील दत्तात्रय मारुती थोपटे यांची राज्याच्या गृह खात्याकडून पोलीस दलात पदोन्नतीने पोलीस उपअधीक्षक जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती,

संभाजीनगर येथे डीवायएसपीपदी नियुक्ती झाली. थोपटे मुंबईत पोलीस दलात ३० वर्षे पीएसआय,

एपीआय पीआय या पदांवर ‘आदर्श पोलीस अधिकारी’ म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत राहिले आहेत.

थोपटे यांना पदोन्नती झाल्याने भोर तालुक्यातून, तसेच वीसगाव खोऱ्यातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

हडपसरच्या नागरिकांसाठी ५०० बेडचे सर्वसुविधा असलेले रुग्णालय अत्यंत गरजेचे आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी याबाबत सकारात्मक चर्चा करून हडपसरला अद्ययावत सुसज्ज रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचे सांगितले.

तसेच, लवकरच रुग्णालयाची उभारणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हडपसरवासीयांचे सर्वसुविधा असलेले अद्ययावत रुग्णालयाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे,

असे या रुग्णालयासाठी मागील चार वर्षांपासून पाठपुरावा करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपविभागप्रमुख महेंद्र बनकर यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व सुविधांयुक्त ५०० बेडच्या रुग्णालयाबाबत महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांची प्रत्यक्ष भेट घेत चर्चा करण्यात आली आहे.

तसेच, हडपसरमधील अण्णासाहेब मगर प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत सुसज्ज सर्व सुविधायुक्त रुग्णालयासाठी उपविभागप्रमुख महेंद्र बनकर यांनी भेट घेतली.

या वेळी विभाग प्रमुख दत्ता खवळे, शाखाप्रमुख कुणाल वाघ, ज्येष्ठ मार्गदर्शक विलास शेलार उपस्थित होते.

महेंद्र बनकर म्हणाले, सध्या हडपसरची लोकसंख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी पुणे महानगरपालिकेचे ६० वर्षांपूर्वीचे जुने आरोग्य केंद्र आहे.

परंतु, ते अत्यंत अपुरे आहे.

सध्या साधारणपणे १० बेडचीच व्यवस्था होत आहे. ६० वर्षांपूर्वी हडपसरच्या लोकसंख्येत आता हजारपट वाढ झाली आहे.

त्या तुलनेत आरोग्य व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. सध्याचा विचार करून अण्णासाहेब मगर प्रसूतिगृहातील बेडची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

या रुग्णालयाला लागून पुणे महानगरपालिकेची जवळपा दोन एकर जागा आहे. त्या जागेत ८ ते १० मजली इमारत उभारून तेथे किमान ५०० बेडची व्यवस्था करता येईल. तसेच सर्व प्रकारच्या तपासण्या सुरू करता येऊ शकतात.

हडपसरसाठी अद्ययावत सुसज्ज रुग्णालयाची मागणी मागील चार वर्षांपासून शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या वतीने करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या मालकीची दोन एकर जागा पडून आहे. तेथे हे रुग्णालय उभारता येईल. परंतु, सध्या येथे सुरू असलेले अण्णासाहेब मगर रुग्णालयात सोनोग्राफी मशीन,

एक्स-रे मशीन तसेच रुग्णांना औषधे वितरित करणाऱ्या व्यवस्थेवर सुधारणा करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. –महेंद्र बनकर, उपविभागप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)