पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला सुरू होणार नवीन रेल्वे गाडी, कसं असणार वेळापत्रक ?

Pune Railway News : दिवाळी आधीच पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर उद्यापासून महाराष्ट्रात नवरात्र उत्सवाचा सण साजरा होणार आहे. शिवाय पुढल्या महिन्यात दिवाळीचा सण देखील राहणार आहे.

अशा परिस्थितीत या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये पुण्यातून विदर्भात आणि विदर्भातून पुण्यात ये-जा करणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होणार आहे. दरम्यान प्रवाशांच्या संख्यत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे ते नागपूर दरम्यान साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे पुणे आणि नागपूर दरम्यान 19 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान विशेष गाडी चालवणार आहे. या गाडीच्या एकूण दहा फेऱ्या या कालावधीत चालवल्या जाणार आहेत. ही गाडी आठवड्यातून एकदा धावेल.

तसेच ही गाडी पुणे ते नागपूर दरम्यानच्या सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवली जाणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी ही गाडी खूपच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान आज आपण या गाडीबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक कसंय ?

नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 19 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी धावणार आहे. ही गाडी १९.४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचणार आहे.

तसेच पुणे नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 20 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी चालवली जाणार आहे. ही गाडी पुणे येथून १६.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे.

कुठे थांबणार गाडी 

ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरूळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवली जाणार आहे.