पुण्यात घर घेण्याचा प्लॅन करताय ? मग पुण्यातील सर्वात मोठे आणि विश्वासार्ह बिल्डर कोणते ? पहा यादी

Pune Real Estate News : पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळाली आहे. याशिवाय पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. अलीकडे या शहरात विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पुणे शहराला आयटी हब म्हणूनही ओळख प्राप्त होऊ लागली आहे.

हेच कारण आहे की पुणे शहरात शिक्षणासाठी तसेच कामानिमित्त देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी, नागरिक स्थायिक होत आहेत. खरंतर पुण्याच्या बाबतीत पुणे तिथे काय उणे असे बोलले जाते. आणि हे शंभर टक्के खरे देखील आहे. पुण्यात नामांकित शैक्षणिक संस्था, नामांकित आयटी कंपन्या, नामांकित वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत.

शहराला मेट्रोची भेट मिळाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी शहराला दोन नवीन मेट्रो मार्गांची भेट मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांवर सध्या मेट्रो सुरु आहे. विशेष असे की रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पर्यंतचा मेट्रो मार्ग बांधून तयार झाला आहे.

या मार्गावर नुकतीच चाचणी देखील घेण्यात आली आहे. याचाच अर्थ आगामी काही महिन्यात हा मेट्रोमार्ग सुरू होणार आहे. एकंदरीत शहरातील पायाभूत सुविधेचा चांगला विकास झाला आहे. मेट्रो व्यतिरिक्त पुणे शहरात लोकलही सुरू आहे. यामुळे पुण्यात वास्तव्य करणे अनेकांचे स्वप्न आहे. येथील स्वच्छ, सुरक्षित वातावरण प्रत्येकालाच आवडते.

दरम्यान जर तुम्हीही पुणे शहरात घर घेऊ इच्छित असाल, तुम्हाला तुमचा स्वतःचा आशियाना पुणे शहरात तयार करायचा असेल आणि तुम्ही पुणे शहरातील नामांकित, विश्वासार्ह आणि सर्वात मोठ्या बिल्डरच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी ठरू शकते. कारण की आज आपण पुणे शहरातील टॉप तीन बिल्डरची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कोलते पाटील डेव्हलपर्स : हे पुण्यातील टॉपचे बिल्डर्स आहेत. खरंतर संपूर्ण भारतात कोलते पाटील डेव्हलपर्स यांचा दबदबा पाहायला मिळतो. मात्र यांचे मुख्यालय पुण्यात आहे. यामुळे पुणे शहरातील ही एक प्रमुख रिअल इस्टेट फर्म आहे. ही कंपनी अनेक निवासी, व्यावसायिक, किरकोळ आणि एकात्मिक टाउनशिप बांधकामाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

या कंपनीचे फक्त पुण्यातच रियल इस्टेट प्रकल्प आहेत असे नाही तर राजधानी मुंबई, बेंगलोर, गोवा येथे देखील या कंपनीने आपले पाय पसरवलेले आहेत. ही कंपनी लक्झरी अपार्टमेंट, व्हिला देखील बनवते.

विशेष म्हणजे तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरातही ही कंपनी परवडणाऱ्या दरातील घरांची श्रेणी उपलब्ध करून देत आहे. यामुळे तुमचा बजेट कोणताही असो तुम्हाला या डेव्हलपर्सकडे तुमच्या गरजेचे घर, फ्लॅट, बंगलो, व्हिला उपलब्ध होणार आहे.

कल्पतरू लिमिटेड : ही देखील पुण्यातील एक नामांकित रिअल इस्टेट फर्म आहे. जर आपणास पुण्यात आपला स्वतःचा, हक्काचा आशियाना बनवायचा असेल तर तुम्ही या फर्म कडे एकदा नक्कीच इन्क्वायरी केली पाहिजे. ही देखील कंपनी देशातील विविध शहरांमध्ये पोहोचलेली आहे. या कंपनीचे प्रकल्प विविध शहरात तुम्हाला पाहायला मिळतील.

या कंपनीला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अर्थातच रियल इस्टेट क्षेत्रातील ही एक नामांकित आणि विश्वासार्ह कंपनी आहे. ही कंपनी दर्जेदार बांधकाम, आधुनिक डिझाईन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकल्प वेळेत तयार करून देण्यासाठी विशेष लोकप्रिय बनली आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरांसाठी इथे संपर्क करू शकता.

परांजपे स्कीम : ही कंपनी पुण्यातील एक रेप्युटेड रिअल इस्टेट फर्म आहे. या कंपनीची स्थापना 1987 मध्ये झाली आहे. अर्थातच शहरातील ही एक जुनी रिअल इस्टेट फर्म आहे. या कंपनीने पुणे शहरात व आसपासच्या परिसरात अनेक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. अनेकांनी आपल्या घराचे स्वप्न या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केली आहेत.

या रियल इस्टेट फर्मने आलिशान निवासी संकुल, सर्वसामान्यांना परवडणारी घरे, टाउनशिप आयटी पार्क आणि व्यावसायिक जागा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. जर तुम्हीही पुण्यात स्वप्नाच्या घराच्या, प्रॉपर्टीच्या शोधात असाल तर एकदा या रियल इस्टेट फर्मशी कॉन्टॅक्ट केलाच पाहिजे.