Pune Ring Road : रिंगरोडच्या भूसंपादनात ह्या तालुक्याने घेतला पहिला नंबर !

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीच्या वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत भूसंपादन करण्याचे निश्चित करण्यात आले. आतापर्यंत १०२१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून, २०५ हेक्टर जमीन ताब्यात आली आहे

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या पश्चिम भागातील हवेली तालुक्यातील भूसंपादनाचे काम सुरू आहे. त्यानुसार पश्चिम मार्गावरील चार तालुक्यांमध्ये हवेली तालुक्याने भूसंपादनात आघाडी घेतली आहे.

तीन महिन्यांत हवेली तालुक्यातील २१० हेक्टर क्षेत्रापैकी संमती करारनाम्याने जवळपास ९४.५० हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे. तर उर्वरित भूसंपादनासाठी सक्तीने भूसंपादन करण्याचे काम सुरू करण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीच्या रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात या रिंगरोडचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी ४४ गावांतील ७२१ हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे.

पाच जुलैपासून पश्चिम मार्गावरील भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. त्यासाठी बाधितांना नोटिसा देऊन ३० जुलैपर्यंत संमतिपत्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली.

अन्य कारणांमुळे ही मुदत २१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानुसार या मुदतीत १४ गावांतील पश्चिम भागातील रिंगरोडसाठी दहा गावांतील क्षेत्राचे भूसंपादन केले आहे.

या १० गावांतील २१० हेक्टर क्षेत्रापैकी ९४.५० हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे. त्याच्या मोबदल्यापोटी २०५ कोटी रुपयांचे वाटप केल्याची माहिती हवेलीचे प्रांत संजय आसवले यांनी दिली.

प्रकल्पासाठी आवश्यक जमीन मालकांना नोटीस पाठवून २१ ऑगस्टपर्यंत संमतिपत्रे देण्याचे आवाहन केले होते.मात्र, नोटिसीची मुदत संपुष्टात आल्याने मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील १३ गावांमधील जमिनींचे सक्तीने भूसंपादन करण्याचे यापूर्वीच निश्चित झाले आहे.

आता उर्वरित १८ गावांमधील म्हणजेच एकूण पश्चिम भागातील ३१ गावांचे सक्तीने भूसंपादन करण्यास जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. या गावांतील ४११ हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करण्यात येणार आहे.