रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हे’ कार्ड बनवले नाही तर स्वस्त रेशन मिळणार नाही ! सरकारचा नवीन निर्णय काय ?

Ration Card News : सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमीच विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारकडून स्वस्त दरात धान्य देखील पुरवलं जात आहे. यासाठी रेशन कार्डची योजना सुरू करण्यात आली आहे. रेशन कार्ड धारकांना सरकारच्या माध्यमातून स्वस्त धान्य उपलब्ध करून दिले जात आहे.

यामुळे गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान केंद्र शासनाने रेशन कार्डबाबत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केशरी आणि पिवळे रेशन कार्ड धारक नागरिकांनी जर आयुष्मान कार्ड काढले नाही तर त्यांना रेशनचा लाभ मिळणार नाहीये.

जर राज्यातील केशरी आणि पिवळे रेशन कार्ड धारकांनी आयुष्मान कार्ड बनवले नाही तर भविष्यात त्यांना स्वस्त धान्याला मुकावे लागेल असे सांगितले जात आहे. खरंतर आयुष्मान भारत योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.

त्याच धर्तीवर राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही योजना एकत्रित करण्यात आल्या आहेत. या दोन्ही योजना एकत्रित करून नागरिकांना लाभ दिला जात आहे.

या दोन्ही योजनेचे एकत्रित कार्ड बनवले जात आहे. याला आयुष्यमान गोल्डन कार्ड म्हणून ओळखले जात असून आता जे पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक हे गोल्डन आयुष्मान कार्ड बनवणार नाहीत त्यांना भविष्यात स्वस्तात धान्य मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

या आयुष्यमान गोल्डन कार्डचा उपयोग करून नागरिकांना सरकारी तसेच खाजगी दवाखान्यात पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

हे आयुष्मान भारत कार्ड बनवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष अभियान चालवले जात आहे. या अंतर्गत नागरिकांना अधिकाधिक हे कार्ड बनवण्यासाठी प्रेरित केले जात आहे.

दरम्यान आता जे केशरी आणि पिवळे रेशन कार्डधारक आयुष्यमान कार्ड काढणार नाहीत त्यांना भविष्यात रेशन मिळणार नसल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांनी लवकरात लवकर हे कार्ड बनवून घ्यावे असे आवाहन जाणकार लोकांनी यावेळी केले आहे.

कुठे बनवणार आयुष्मान कार्ड

आयुष्मान कार्ड हे कुठल्याही सरकारी रुग्णालयात बनवले जाऊ शकते. विशेष म्हणजे हे कार्ड सीएससी सेंटरवर जाऊन देखील नागरिकांना बनवून घेता येणार आहे. हे कार्ड केशरी आणि पिवळे रेशन कार्ड धारकांना बनवता येणार आहे. जर तुम्ही अजूनही हे कार्ड बनवलेले नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटरवर भेट देऊन हे कार्ड बनवू शकता.

कोणते नागरिक राहणार पात्र

आयुष्मान कार्डसाठी राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक नागरिक पात्र राहणार आहेत. यामुळे जर तुमचेही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे कार्ड काढून घ्यावे लागणार आहे. याचा लाभ घेऊन तुम्ही पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकणार आहात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत.