लवकरच येतेय Royal Enfield Himalayan 452 , जाणून घ्या फीचर्ससह किंमत व स्पेसिफिकेशन्स

RE Himalayan 452 : आगामी रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 मोटारसायकलचे पहिले अधिकृत छायाचित्र जारी करण्यात आले आहे. हे मॉडेल 1 नोव्हेंबर 2023 रोजी लाँच करण्यात येणार आहे. आरई हिमालयन 452 मध्ये 4-व्हॉल्व्ह हेड आणि DOHC कॉन्फिगरेशनसह 451.65 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते.

तिची पॉवर व टॉर्कची आकडेवारी सध्या तरी कळू शकलेली नाही. मात्र, हे इंजिन 8,000rpm वर 39.57bhp चे आउटपुट आणि र 40-45Nm टॉर्क देऊ शकते, असा अंदाज आहे. यात 6 स्पीड गियरबॉक्स असण्याची शक्यता आहे.

हार्डवेयर व फीचर्स

ही मोटारसायकल ऑफ-रोड क्रूझर म्हणून उपलब्ध असेल, ज्यात हाय अल्टिट्यूड एलईडी हेडलाइट्स, चोचीसारखे फॉरवर्ड फेंडर, एक्सटेंडेड फ्यूल टँक आणि विंडस्क्रीन, स्प्लिट सीटिंग आणि कॉम्पॅक्ट टेल सेक्शन असेल. यात वायर स्पोक व्हील्स असतील.

फ्रंट व्हील 21 इंच आणि रियर व्हील 17 इंच असू शकते. फ्यूल टँक, फ्रंट मडगार्ड, साइड पॅनेल आणि रिअर फेंडरवर हिमालयन ब्रँडिंग देण्यात येणार आहे. बाइकची लांबी 2,245 मिमी, रुंदी 852 मिमी आणि उंची 1,316 मिमी असू शकते. यात 1,510 मिमी चा व्हीलबेस असू शकतो.

याचे एकूण वजन 394 किलो असू शकते. नव्या रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 च्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये फ्रंट आणि रिअर दोन्ही डिस्क ब्रेक असतील. ड्युअल चॅनेल एबीएस (अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम) देखील असेल. या अॅडव्हेंचर बाइकमध्ये यूएसडी फ्रंट फोर्क्स, मोनोशॉक रियर सस्पेंशन, राइड-बाय-वायर टेक्नॉलॉजी आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत आणि स्पर्धा

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आगामी रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 ची किंमत 2.50 लाख ते 2.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असेल असा अंदाज आहे. सध्याच्या हिमालयन मॉडेलपेक्षा याची किंमत थोडी जास्त असेल. लाँचिंगनंतर हिमालयन 452 ची टक्कर बीएमडब्ल्यू जी 310 जीएस, केटीएम 390 ऍडव्हेंचर सारख्या बाइकशी होईल.