भाऊबीजच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील ‘या’ मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला आजचा सर्वोच्च भाव ! वाचा सविस्तर

Soyabean Market Rate : गेल्या काही दिवसांपासून पिवळं सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांच्या काळात सोयाबीन बाजार भावात 200 ते 300 रुपयापर्यंतची सुधारणा झाली आहे.

बाजारभावात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायाला मिळत आहे. खरंतर सोयाबीनच्या दरात गेल्या एका वर्षापासून मंदी होती. या चालू हंगामाच्या सुरुवातीला देखील बाजार भाव दबावात होते.

पण आता बाजारभावात हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे.  याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान पाहायाला मिळत आहे. ऐन दिवाळीच्या आधीच दरात सुधारणा झाली असल्याने उत्पादकांची दिवाळी यंदा गोड झाली आहे.

तथापि शेतकऱ्यांना जसा बाजार भाव अपेक्षित होता तेवढा विक्रमी भाव अजूनही मिळत नाहीये. परंतु बाजारभावात सुधारणा झाली असल्याने आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होईल अशी आशा आता शेतकऱ्यांना लागली आहे.

शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान आता आपण आज महाराष्ट्रातील प्रमुख बाजारात भाऊबीजच्या मुहूर्तावर सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, आज सोयाबीनला 5000 ते 5277 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 4400 ते 5165 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पाहायला मिळाले आहेत.

कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च दर

देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : आज 15 नोव्हेंबर 2023 रोजी देवणी एपीएमसी मध्ये सोयाबीनची 213 क्विंटल आवक झाली होती. या मार्केटमध्ये आज सोयाबीनला किमान 5,100, कमाल 5277 आणि सरासरी 5188 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

आष्टी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला किमान 5190, कमाल 5260 आणि सरासरी 5190 प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला किमान 4800, कमाल 5250 आणि सरासरी 5125 एवढा भाव मिळाला आहे.