The Richest Person In Pune : ‘फोर्ब्स’ या अमेरिकेतील प्रसिद्ध बिजनेस मॅगझीनने नुकतेच भारतातील शंभर श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशातील 100 श्रीमंत व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये बहुतांशी बिजनेस टायकूनचा समावेश आहे. देशातील नामांकित उद्योगपतींचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान आज आपण ‘फोर्ब्स’ या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.
विशेष म्हणजे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देशातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरला आहे. खरंतर पुणे हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. पुणे शहरात विविध शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे येथे शिक्षणासाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी येतात.
सोबतच पुणे शहर राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवते यामुळे याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचा देखील दर्जा प्राप्त आहे. अलीकडे मात्र पुणे शहराचा औद्योगिक विकास देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील नागरिकीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. शहरात गेल्या काही वर्षांमध्ये जगातील नामांकित आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे.
हेच कारण आहे की आता पुण्यनगरी Pune आयटी हब म्हणून वेगाने विकसित होत चालले आहे. शिक्षणाचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून जगात ख्यातनाम पुणे शहरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहेत ? असा सवाल उपस्थित होत होता.
दरम्यान, सायरस पूनावाला हे या वर्षातील पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. Forbes या बिजनेस मॅगजीनने सायरस पुनावाला हे पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे पूनावाला हे देशातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून उदयास आले आहेत.
देशातील शंभर श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुणावाला सहाव्या क्रमांकावर असून पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. Pune येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. ही कंपनी दरवर्षी गोवर, पोलिओ आणि फ्लूसह लसींचे 1.5 अब्ज पेक्षा जास्त डोस बनवते.
या कंपनीने कोरोना महामारीशी लढण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. कोरोनाची कोविशिल्ड ही लसं देखील या कंपनीने तयार केली आहे. सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती 20.9 अब्ज डॉलर आहे. कोरोना काळापासून त्यांच्या संपत्तीत वेगाने वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, 2020 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 8.2 अब्ज डॉलर्स होती आणि 2022 मध्ये त्यांची संपत्ती 24.3 अब्ज डॉलर्स एवढी झाली होती.
मात्र यंदा त्यांच्या संपत्तीत गेल्यावर्षीच्या तुलनेत थोडी घटली आहे. 2022 च्या तुलनेत यंदा त्यांच्या संपत्तीत 4 अब्ज डॉलरहून अधिक घट आली आहे. मात्र असे असले तरी ते देशातील सहावे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत आणि पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत.