वेल्हे तालुका पोलीस पाटील पदाची निवड यादी जाहीर

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पोलीस पाटील भरतीची अंतिम यादी प्रांताधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे.

हे पद शासकीय स्तरावर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या कार्यभारासाठी या पदाचा उपयोग होतो.

या पदासाठी तालुक्यातील शेकडो उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली होती.

८ ऑक्टोबर लेखी परीक्षा तसेच ११ ऑक्टोबरला घेण्यात आलेली तोंडी परीक्षा या दोन्हींमध्ये अव्वल गुणवत्ता सिद्ध करणारे उमेदवार या पदासाठी पात्र ठरले आहेत. १४ ऑक्टोबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.

पोलीस पाटील पदासाठी वेल्हे तालुक्यातील गावनिहाय निवड झालेल्या उमेदवारांमध्ये ओसाडे : नीळकंठ शिवाजी लोहकरे,

कानंद: संजय रामचंद्र कडू, कोंडगाव : रेणुका केतन दारवटकर, कोंढवली निखिल भरत करंजकर,

कोंढावळे : रेणुका शंकर खोपडे, कोळवडी : किरण रतन चोरघे, खांबवडी: अमोल बाळु नलावडे, घावर : भरत शांताराम रांजणे, घिसर : सुनील शिवाजी धिंडले, दापसरे दिलीप भांबु ढेबे,

दापोडे : पांडुरंग संपत शेंडकर, धानेप: अश्विनी सचिन मळेकर, निवी : अनिल मारुती जोगडे, पाबे : स्वाती युवराज रेणुसे,

पाल बु. : विश्वास गंगाराम शिर्के, मार्गासनी: वैभव निवृत्ती वालगुडे, वरसगाव प्रियांका मोहन पासलकर,

वांगणी : जितेंद्र भरत मुजुमले, वांजळे : आशिष भीमराव गायकवाड, सुरवड : अजिंक्य नथू शिंदे यांचा समावेश आहे.

गुणवत्ता सिद्ध करणाऱ्यांना पोलीस पाटील पदासाठी संधी मिळाली आहे, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी