केंदूरमध्ये चावलेल्या सापासह युवक स्वतः रुग्णालयात

केंदूर (ता. शिरूर) येथील एका युवकाला सर्पदंश झाल्यानंतर युवक घाबरलेला असताना

देखील त्याने लगेच तो साप पकडून पिशवीमध्ये टाकून मित्राच्या मदतीने सापासह शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालय गाठले.

मात्र शिक्रापुरातील सर्पमित्रांच्या धीर व आधाराने सदर युवकाने स्वतःहून डिस्चार्ज मागितल्याने उपस्थितांनी सर्पमित्र व डॉक्टरांचे आभार मानले.

केंदूर येथील ठाकर वस्ती येथील हर्षद शेकटकर या युवकाला अंघोळीसाठी कपडे घेत असताना सर्पदंश झाला.

यावेळी त्याने स्वतः साप पाहिला. मात्र क्षणाचा विलंब न करता सापाला पिशवीत टाकले आणि लगेचच वृषभ खडसे यांच्या मदतीने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय गाठले.

यावेळी येथे उपस्थित डॉक्टरांनी साप पाहिला असता मण्यार असल्याचा अंदाज वर्तवला.

सदरचा साप हा कवड्या जातीचा बिनविषारी असल्याचे निदर्शनास आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम,

उज्वला टेमगिरे आदी उपस्थित होते. सर्पमित्रांनी सदर सापाला ताब्यात घेतले व साप पूर्णपणे बिनविषारी असल्याचे सांगितले असता हर्षद यांनी सर्पमित्रांचे आभार मानले.